Lokmat Sakhi >Beauty > कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय...

कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय...

How To Do Heatless Curls & Waves Hairstyle With Household Items : Secret Tricks To Get Gorgeous Waves & Curls Without Heat : हिटिंग टूल्स न वापरता केसांना द्या कर्ल्स, वेव्ही लूक, गरब्यासाठी हेअर स्टायलिंग करण्याच्या सोप्या दोन पद्धती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 10:38 PM2024-09-30T22:38:32+5:302024-09-30T22:58:14+5:30

How To Do Heatless Curls & Waves Hairstyle With Household Items : Secret Tricks To Get Gorgeous Waves & Curls Without Heat : हिटिंग टूल्स न वापरता केसांना द्या कर्ल्स, वेव्ही लूक, गरब्यासाठी हेअर स्टायलिंग करण्याच्या सोप्या दोन पद्धती...

How To Do Heatless Curls & Waves Hairstyle With Household Items Secret Tricks To Get Gorgeous Waves & Curls Without Heat | कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय...

कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय...

नवरात्री आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सगळ्यांच्याच घरी नवरात्रीची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. नवरात्रीच्या उपवासांपासून ते गरबा खेळताना कोणते नवीन कपडे घालावे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची अगदी जय्यत तयारी झाली असेल. नवरात्रीत खेळला जाणारा गरबा म्हणजे अनेकांचा आवडता विषय. गरबा खेळायला जाताना अनेकजणी अगदी व्यवस्थित नीटनेटकं आवरुन तयार होऊन जातात. गरबा खेळण्यासाठी तयार होतानामोठमोठाले घेरदार घागरे, मेकअप, त्यावर शोभेल अशी हेअर स्टाईल असं सगळं टापटीप आवरुन जाणे पसंत केले जाते( Secret Tricks To Get Gorgeous Waves & Curls Without Heat).

नवरात्रीत वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी घागरे घातल्यानंतर त्यावर शोभून दिसेल अशी हेअर स्टाईल करणे तर आवश्यकच आहे. या हेअर स्टाईल करताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर टूल्सचा वापर करतो. या हेअर टूल्सचा वापर करुन आपण केसांना हवे तसे सेट करून अनेक हेअर स्टाईल करु शकतो. परंतु या हेअर टूल्सचा वापर करताना त्यातून येणारी हिट आपल्या केसांसाठी हानिकारक ठरु शकते. केसांची फारशी हेअर स्टाईल करताना आली नाही तरी आपण झटपट होणारे कार्ल्स तरी नक्कीच करतो.गरबा खेळायला जाताना घाई गडबडीच्यावेळी केसांना कर्ल करायचे असेल, तर हिटिंग टूल्सचा वापर न करता देखील आपण कर्ल्स करु शकतो. यासाठी सोप्या दोन ट्रिक्सचा वापर करून आपण केसांना कर्ल्स करु शकतो ते कसे ते पाहूयात(How To Do Heatless Curls & Waves Hairstyle With Household Items).

१. टिश्यू पेपरचा वापर करून करा कर्ल्स... 

टिश्यू पेपरचा वापर करून देखील आपण केसांचे कलर्स (simple way to get heatless curls) करु शकतो. यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात टिश्यू पेपर लागणार आहेत. सगळ्यात आधी टिश्यू पेपर घेऊन त्याला गोल गुंडाळून सुरनळीसारखा आकार करुन घ्यावा. आता ही सुरनळी एका हातात आडवी पकडून या आडव्या सुरनळीला आपल्या केसांच्या छोट्या - छोट्या बटा गोल गुंडाळून डोक्याच्या दिशेने वर न्याव्यात. केसांची बट संपूर्णपणे गुंडाळून झाल्यावर बरोबर डोक्यावर ही सुरनळी आल्यावर केसांना अलगद पकडून त्यांना रबर बँड लावून घ्यावा. आता हळुहळु सगळ्या केसांच्या लहान बटा गुंडाळून झाल्यावर केस रात्रभर किंवा किमान ५ ते ६ तास तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर सगळे रबर बँड काढून हळुहळु या बटा सोडवून टिश्यू पेपर काढून घ्यावा. आता आपले केस हेअर टूल्स आणि हिटिंग (Curly Hair Without Heat) शिवाय नॅचरल पद्धतीने कलर्स झालेले असतील.    

गरबा खेळून घाम येतो - मेकअप पसरू नये म्हणून 'असा ' करा वॉटरप्रूफ मेकअपबेस...


  

तुमच्या स्किन टाइपनुसार करा चेहऱ्यावर स्क्रबिंग, ‘इतक्या’ दिवसांनी केलं तरच मिळतील स्क्रबिंगचे फायदे-पाहा कसे...

२. अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर करून केसांना द्या वेव्ही लूक...    

केसांवर हिटिंग टूल्सचा वापर न करता वेव्ही लूक देण्यासाठी आपण अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा (Secret Tricks To Get Gorgeous Waves Without Heat) वापर करू शकता. यासाठी सर्वात आधी केसांचा गुंता सोडवून केस व्यवस्थित विंचरुन घ्यावेत. आता केसांच्या बरोबर मधोमध भांग पाडून केसांचे दोन भागात विभाजन करुन घ्यावेत. आता वेणी घालतो तसे  केसांच्या या दोन भागांची बरोबर मधोमध एक वेणी घालून घ्यावी. वेणी घातल्यानंतर त्या वेणीच्या लांबी इतका अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा मोठा तुकडा घ्यावा. त्यानंतर ही संपूर्ण वेणी अ‍ॅल्युमिनियम फॉईलने कव्हर करुन घ्यावी आणि सगळ्यात शेवटी खाली वेणीला रबर बँड लावून घ्यावा. आता ब्लो ड्रायर घेऊन या अ‍ॅल्युमिनियम फॉईलवर सगळ्या बाजुंनी फिरवून घ्यावा. त्यानंतर किमान ६ ते ७ तासांसाठी किंवा ओव्हर नाईट आपण हे असेच ठेवू शकता. जेव्हा आपण अ‍ॅल्युमिनियम फॉईल काढून ही वेणी ओपन करुन पहाल तेव्हा केसांना मस्त असा वेव्ही लूक आला असेल. 

नखं वाढतच नाहीत, वारंवार तुटतात? हे घ्या होममेड सुपर हेल्दी ऑईल-नखं चमकतील...


अशा प्रकारे आपण नवरात्रीत वेगवेगळ्या हेअर स्टाईल करण्यासाठी हिटिंग टूल्सचा वापर न करता देखील केसांना हटके कर्ल्स आणि वेव्ही लूक देऊ शकता.

Web Title: How To Do Heatless Curls & Waves Hairstyle With Household Items Secret Tricks To Get Gorgeous Waves & Curls Without Heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.