Lokmat Sakhi >Beauty > आईस फेशियल! त्वचा तरुण ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय- पण करताना मात्र 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर.....

आईस फेशियल! त्वचा तरुण ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय- पण करताना मात्र 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर.....

Benefits Of Ice Facial: त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी आईस फेशियल म्हणजेच बर्फाचं फेशियल हा एक सोपा उपाय आहे. पण ते करताना एका गोष्टीची काळजी मात्र घ्यायलाच हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2023 02:50 PM2023-10-28T14:50:19+5:302023-10-28T14:51:03+5:30

Benefits Of Ice Facial: त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी आईस फेशियल म्हणजेच बर्फाचं फेशियल हा एक सोपा उपाय आहे. पण ते करताना एका गोष्टीची काळजी मात्र घ्यायलाच हवी...

How to do ice facial, Benefits of ice facial, how to take care of skin while doing ice facial? ice facial for young, glowing and radiant skin | आईस फेशियल! त्वचा तरुण ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय- पण करताना मात्र 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर.....

आईस फेशियल! त्वचा तरुण ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय- पण करताना मात्र 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर.....

Highlightsआईस फेशियल करताना मात्र एका गोष्टीची काळजी घ्यायलाच हवी.. नाहीतर मग त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

आता काही दिवसांवर दिवाळी आली आहे. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाला दिवाळीचे वेध लागायला सुरूवात झाली आहे. यात महिलांच्या मागे तर जरा जास्तच गडबड असते. घराची स्वच्छता, शॉपिंग, फराळाची तयारी, घराची सजावट या गोष्टी प्रामुख्याने त्यांनाच बघाव्या लागतात. त्यात पुन्हा स्वत:च्या सौंदर्याकडेही लक्ष द्यायचं असतं. कारण दिवाळीला आपणही सुंदर दिसावं, अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. त्यात आता त्वचेवर झटपट ग्लो आणायचा असेल तर घरगुती उपाय करण्याकडे अनेकींचा कल असतो (ice facial for young, glowing and radiant skin). या उपायांमध्ये आईस फेशियल किंवा बर्फाने चेहऱ्याला मसाज हा उपायही अनेकजणी करतात. (how to take care of skin while doing ice facial?)

 

आईस फेशियल करताना १ गोष्ट लक्षात ठेवा...

खरंतर त्वचा तरुण ठेवण्यासाठी आणि त्वचेला चमकदार करण्यासाठी आईस फेशियल हा उपाय खूपच चांगला आहे. शिवाय यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याचीही गरज नाही.

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही हा उपाय घरबसल्या करू शकता. पण आईस फेशियल करताना मात्र एका गोष्टीची काळजी घ्यायलाच हवी.. नाहीतर मग त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आईस फेशियल करताना तुम्ही जो बर्फ वापरणार आहात, तो फ्रिजमधून बाहेर काढल्यावर लगेचच चेहऱ्याला लावू नका. २० सेकंद ते अर्धा मिनिट तो रुम टेम्परेचरवर ठेवा.

 

उगवली शुक्राची चांदणी! पाहा पांढऱ्या साडीतले ‘क्लासी’ लूक!

त्यानंतर तो एका मऊ कापडात गुंडाळा आणि मगच चेहऱ्यावरून फिरवा. तो तसच थेट चेहऱ्यावरून फिरवल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तसेच ज्यांची त्वचा सेन्सिटीव्ह आहे, अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आईस फेशियल करू नये.

 

आईस फेशियल करण्याचे फायदे

१. आईस फेशियल केल्यामुळे स्किन टाईटनिंगसाठी मदत होते. त्यामुळे त्वचा तरुण दिसते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत.

डोक्यावरून घेतलेला पदर-ओढणी सारखी सटकते? पदर डोक्यावर घेताना लक्षात ठेवा १ सोपा उपाय

२. आईस फेशियल केल्याने त्वचेखालचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे त्वचेवर तेज येते, त्वचा चमकदार दिसू लागते.

३. त्वचेखालचा रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने ॲक्ने, पिंपल्स यांचा त्रासही कमी होतो. 

 

Web Title: How to do ice facial, Benefits of ice facial, how to take care of skin while doing ice facial? ice facial for young, glowing and radiant skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.