चमकदार त्वचेसाठी महिला फेशियल करणं पसंत करतात. उन्हाळ्याच्या हंगामात, रासायनिक क्रीम्ससह त्वचेवरील प्रक्रियेमुळे अनेकदा त्वचा खराब होते. अशा स्थितीत त्वचेला थंड करण्यासाठी तुम्ही बर्फाचे पाणी चेहऱ्यावर लावू शकता. आइस वॉटर फेशियल सध्या खूप लोकप्रिय होत आहेत. आइस फेशियलच्या मदतीने त्वचेला थंडावा तर मिळतोच पण चेहऱ्यावर चमकही येते. (Ice water facial benefits in marathi)
हे फेशियल करवून घेण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, तुम्ही ते घरी सहज करू शकता. कोरियन आणि जपानी महिला आइस वॉटर फेशियल करतात. आइस वॉटर फेशियलचे फायदे आणि ते करण्याच्या स्टेप बाय स्टेप पद्धती जाणून घेऊया. (How To Do Ice Water Facial At Home )
आईस वॉटर फेशियल घरी सहज करता येते. हे फेशियल करण्यासाठी एक मोठी वाटी घ्या. यानंतर, भांडं बर्फाच्या पाण्याने भरा. त्यानंतर पाण्यात चेहरा बुडवा. आपला चेहरा ३० सेकंद पाण्यात बुडवून ठेवा. आता यानंतर चेहरा बाहेर काढा. त्यानंतर कापसाने चेहरा स्वच्छ करा. आता पुन्हा एकदा चेहरा थंड पाण्यात ३० सेकंद बुडवा. ही प्रक्रिया तुम्ही तीन ते चार वेळा करू शकता. याशिवाय बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळून चेहऱ्यावर स्क्रब करा.
आईस वॉटर फेशियलचे फायदे
१) चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी बर्फाचे पाणी खूप फायदेशीर आहे. सकाळी उठल्यानंतर अनेकदा चेहऱ्यावर सूज दिसून येते. ही सूज कमी करण्यासाठी आईस वॉटर फेशियलचा वापर केला जाऊ शकतो.
२) उन्हाळ्यात मुरुमांच्या समस्येने महिलांना अनेकदा त्रास होतो. विशेषत: तेलकट त्वचेवर मुरुमांचा प्रादुर्भाव होतो. पुरळांचे सौंदर्य कमी होते. चेहऱ्यावर मुरुमं झाली की ते लवकर बरे होत नाहीत. अशा स्थितीत तुम्ही आइस फेशियलच्या मदतीने मुरुमे कमी करू शकता.
३) बर्फाचे पाणी केवळ चेहऱ्यावरील डागच नाही तर काळी वर्तुळे देखील दूर करण्यास मदत करते. चेहऱ्यावर एकदा काळी वर्तुळे आली की ती लवकर कमी होत नाहीत. डार्क सर्कल कमी करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची क्रीम्स उपलब्ध आहेत, पण या क्रीम्सचा काही विशेष परिणाम होत नाही. अशा स्थितीत काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा आइस वॉटर फेशियल करू शकता.
अशी घ्या काळजी
१) मेकअप काढण्यासाठी बर्फाचे पाणी वापरू नका. मेकअप काढण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा.आईस वॉटर फेशियल करताना चेहऱ्यावर मेकअप वापरू नका.
२) फेशियल करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.
३) जर तुम्ही चेहऱ्यावर बर्फ वापरत असाल तर लक्षात ठेवा की थेट चेहऱ्यावर बर्फ लावू नका. बर्फ नेहमी कापडात गुंडाळून लावावा.