Join us  

फक्त १ मिनिटांत घरीच करा आईस वॉटर फेशियल; ब्लिच-फेशियलचा खर्च न करता मिळेल ग्लोईंग स्किन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 9:09 AM

How to do ice water facial : आईस फेशियल हा शब्द तुम्ही वारंवार ऐकत असाल, ते घरीही करणं सोपं असतं.

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील उष्णता वाढल्यानं अनेक स्किन प्रोब्लेम्स उद्भवतात. कधी त्वचेवर पुळ्या येतात तर कधी काळे डाग. पिंपल्स आणि काळे डाग काढून टाकण्यासाठी बाजारात अनेक क्रिम्स, पार्लर ट्रिटमेंट्स उपलब्ध आहेत. (How to do ice water facial) पण त्यामुळे पैसे जातात आणि तात्पुरता परीणाम दिसतो. स्किन केअर रूटीन फॉलो केल्यास तुम्हाला त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.  त्वचेवर ग्लो येण्यासाठी तुम्ही आईस वॉटर फेशियल करू शकता. (Korean beauty hack of soaking face in ice water)

आईस वॉटर फेशियल कसे करायचे?

आईस वॉटर फेशियल करण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात बर्फ घ्यावा लागेल. तुम्हाला एक मोठा वाडगा घ्यावा लागेल ज्यामध्ये बर्फाचे पाणी टाकावे लागेल. आता त्यात चेहरा बुडवा. तुम्हाला हे 30 सेकंदांसाठी करावे लागेल. नंतर कॉटन टॉवेलने चेहरा कोरडा करा आणि मॉइश्चरायझ करा. जेव्हा तुमच्या चेहऱ्याचे तापमान सामान्य होते, तेव्हा तीच प्रक्रिया पुन्हा करा.

चेहरा 30 सेकंदांसाठी बुडवून ठेवा. दिवसातून दोनदा ही क्रिया अवश्य करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसेल. याशिवाय आणखी एक मार्ग आहे, तुम्ही सुती कपड्यात बर्फ गुंडाळून चेहऱ्यावर लावू शकता. कोरियन ग्लास स्किन मिळविण्याचा हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

फायदे

१) चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची त्वचा सूज असेल तर ती देखील कमी करते. यामुळे तुमचा चेहरा एकदम फ्रेश दिसतो.

२) आईस फेशियल चेहऱ्यावरील डार्क सर्कलची समस्या दूर करण्यास मदत करते. चेहऱ्यावर आइस वॉटर फेशियल केल्याने डागांची समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा आइस फेशियल करता येते.

३) आईस फेशियल चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यास मदत करते. असे केल्याने त्वचेवरील थंडपणाबरोबरच चेहऱ्यावरील टॅनिंगही दूर होते. नियमित आइस फेशियल केल्याने चेहऱ्यावरील चमक वाढते.

आईस वॉटर फेशियल करताना हे लक्षात ठेवा

मेकअप काढण्यासाठी बर्फाचे पाणी वापरू नका. मेकअप काढण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. आईस वॉटर फेशियल करताना चेहऱ्यावर मेकअप वापरू नका.  फेशियल करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. जर तुम्ही चेहऱ्यावर बर्फ वापरत असाल तर लक्षात ठेवा की थेट चेहऱ्यावर बर्फ लावू नका. बर्फ नेहमी कापडात गुंडाळलेला असावा.

टॅग्स :त्वचेची काळजीहेल्थ टिप्सआरोग्य