Lokmat Sakhi >Beauty > पावसाळ्यात मेकअप करताना जरा जपून... शेहनाज हुसेन यांनी दिल्या ५ खास टिप्स, मेकअप टिकेल दिवसभर

पावसाळ्यात मेकअप करताना जरा जपून... शेहनाज हुसेन यांनी दिल्या ५ खास टिप्स, मेकअप टिकेल दिवसभर

How To Do Makeup In Rainy Season: पावसाळ्यात मेकअप करणं थोडं कठीणच असतं.. त्यामुळेच मेकअप परफेक्ट (tips for perfect make up) व्हावा आणि अधिक काळ टिकावा, यासाठी शेहनाज हुसेन यांनी सांगितलेल्या काही मेकअप टिप्स फॉलो करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 05:17 PM2022-07-26T17:17:22+5:302022-07-26T17:30:10+5:30

How To Do Makeup In Rainy Season: पावसाळ्यात मेकअप करणं थोडं कठीणच असतं.. त्यामुळेच मेकअप परफेक्ट (tips for perfect make up) व्हावा आणि अधिक काळ टिकावा, यासाठी शेहनाज हुसेन यांनी सांगितलेल्या काही मेकअप टिप्स फॉलो करा..

How to do long lasting makeup in monsoon or rainy season, Make up tips for monsoon  | पावसाळ्यात मेकअप करताना जरा जपून... शेहनाज हुसेन यांनी दिल्या ५ खास टिप्स, मेकअप टिकेल दिवसभर

पावसाळ्यात मेकअप करताना जरा जपून... शेहनाज हुसेन यांनी दिल्या ५ खास टिप्स, मेकअप टिकेल दिवसभर

Highlightsसगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर तुमचा मेकअप वॉटर प्रुफ असायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे या दिवसांत चेहऱ्यावर येणारं अतिरिक्त ऑईल अगदी व्यवस्थित कंट्रोल झालं पाहिजे.

पावसाळ्यात हवा अतिशय दमट असते. दमट हवेमुळे चेहरा बऱ्याचदा खूपच ऑईली (oily skin) दिसू लागतो. शिवाय पावसाळ्यात मेकअप करून घराबाहेर पडायचं झालं तरी कधी पावसाची सर येईल आणि तुम्हाला भिजवेल सांगता येत नाही. या दोन्ही गोष्टींमुळेच पावसाळ्यात मेकअप (How to do long lasting makeup in monsoon) करताना थोडी विशेष काळजी घ्यावीच लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर तुमचा मेकअप वॉटर प्रुफ (water proof make up in rainy season) असायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे या दिवसांत चेहऱ्यावर येणारं अतिरिक्त ऑईल अगदी व्यवस्थित कंट्रोल झालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी जमल्या तरच मेकअप छान दिसेल आणि लाँगलास्टिंग ठरेल.

 

खास पावसाळ्यासाठी मेकअप टिप्स...
१. पावसाळ्यात मेकअपला सुरुवात करण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्यावरून बर्फ फिरवायला विसरू नका. यामुळे चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स बंद होण्यास मदत होते आणि ऑईल सिक्रिशन बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात राहतं. या स्टेपनंतर टोनर लावा. टोनर लावताना ते शक्यतो रोज वॉटर बेस असेल तर अधिक उत्तम.

त्वचेची चमकच गेली, चेहरा निस्तेज? चेहऱ्याला द्या खास ऑइल मसाज, त्वचा होईल सुंदर- चमकदार

२. एवढं करूनही चेहरा खूपच तेलकट होत असेल तर पावसाळ्यात दिवसा मेकअप करताना शक्यतो फाउंडेशन लावणं टाळा.  त्याऐवजी कलरलेस बेबी पावडर आणि त्यानंतर तुमचं नेहमीचं कॉम्पॅक्ट पावडर वापरा. रात्रीचा मेकअप करताना फाउंडेशन लावू शकता. पण ते वॉटर बेस असावं. 

 

३. ब्लशर वापरणार असाल तर तो पावडर बेस वापरा. कारण त्यामुळे चेहऱ्यावरचं तेल बऱ्याच प्रमाणात नियंत्रित राहील. शिवाय चेहरा अधिक चमकदार दिसण्यासाठी त्याची मदत होईल. पावसाळ्यात शक्यतो पीच किंवा पिंक यामधले हलके शेड वापरावेत. 

 

४. लिपस्टिक लावल्यानंतर त्यावरून लिप ग्लॉसने टचअप करा. किंवा या दिवसांत ग्लॉसी लिपस्टिकचा वापर करा. पिंक, पीच, चेरी असे लाईट ब्राईट शेड या दिवसांत छान दिसतात. रात्रीचा मेकअप करताना लिपस्टिकनंतर लिपग्लॉस नाही लावला तरी चालेल. पण त्यावेळी मग लिपस्टिकचे शेड ब्राईट कलरचे निवडावेत.

 

५. डोळ्यांचा मेकअपही या दिवसांत खूपच काळजीपुर्वक करावा लागतो. डे मेकअप करत असाल तर आय लायनर किंवा काजळ हे डार्क काळ्या रंगातलं निवडण्यापेक्षा ब्राऊन किंवा ग्रे शेडमधलं निवडा. आणि त्यानंतर डार्क ब्लॅक रंगाचा मस्कारा लावा. आयशॅडो न लावताही डोळ्यांचा मेकअप परफेक्ट होईल आणि डोळे उठून दिसतील. रात्रीच्या वेळी मात्र ब्लॅक आय लायनर, ब्लॅक काजळ आणि आयशॅडोचे ब्राईट कलर तुम्ही ट्राय करू शकता. 
 

Web Title: How to do long lasting makeup in monsoon or rainy season, Make up tips for monsoon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.