Join us  

ऑफिससाठी नॅचरल लूक देणारा मेकअप झटपट कसा करायचा? ४ टिप्स, दिसाल स्मार्ट- सुंदर आणि प्रोफेशनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 2:31 PM

How To Do Makeup For Office: ऑफिस किंवा कोणत्याही फॉर्मल कार्यक्रमाला जाताना नॅचरल लूक देणारा मेकअप झटपट कसा करायचा, ते पाहा... (tips and tricks for natural look makeup for office)

ठळक मुद्देचरल लूक देणारा मेकअप कसा करायचा आणि तो ही सकाळच्या धावपळीत अगदी कमीतकमी वेळेत, ते पाहूया

हल्ली प्रेझेंटेबल राहण्यासाठी थोडाफार मेकअप करणं ही अगदी गरजेची बाब झाली आहे. पण इतर  कोणत्याही प्रसंगी मेकअप करणे आणि ऑफिसला जाताना मेकअप करणे यात खूप फरक आहे.  कारण ऑफिससाठी जो मेकअप करता, तो खूप हलका असला पाहिजे (How to do makeup for office). त्यात भडकपणा, चमक अजिबात नको. पण तरीही तो तुमचं व्यक्तिमत्व खुलवणारा पाहिजे (How to get ready smartly for office). आता असा नॅचरल लूक देणारा मेकअप कसा करायचा आणि तो ही सकाळच्या धावपळीत अगदी कमीतकमी वेळेत, ते आता पाहूया...(tips and tricks for natural look makeup for office)

 

ऑफिससाठी नॅचरल लूक देणारा मेकअप कसा करायचा?

ऑफिसमध्ये जातात कमीतकमी वेळेत नॅचरल लूक देणारा परफेक्ट मेकअप कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ thepearshapedstylist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

ॲसिडीटी, पोट फुगणे, कॉन्स्टिपेशन असा त्रास टाळण्यासाठी रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका ५ पदार्थ

१. यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑफिसला जाताना कोणतंही हेवी फाउंडेशन लावण्याऐवजी BB cream किंवा टिंटेड मॉईश्चराझर लावा. 

२. जर तुमच्या चेहऱ्यावर डार्कसर्कल्स असतील तर ऑरेंज रंगाचं कलर करेक्टर वापरा. 

 

३. यानंतर कन्सिलर लावा. पण कन्सिलर तुमच्या डोळ्यांच्या कडांना अगदी चिटकून घेऊ नका. थोड्या अंतराने लावा. कारण यामुळे मेकअप हेवी दिसू शकतो. डोळे बारीक दिसतात. कन्सिलर लावून झाल्यानंतर एखादी न्यूड शेडची आयशॅडो लावा. त्याचीही अगदी पातळ शेड लावावी. 

'नॅचरल पेनकिलर' असणारे ४ घरगुती पदार्थ- बघा आयुर्वेदानुसार कोणता त्रास कमी करण्यासाठी काय खावं

४. यानंतर काजळ किंवा आयलायनर लावा. ते शक्यतो ब्लॅक किंवा डार्क ब्राऊन रंगाचंच असावं.

५. लिपस्टिक लाताना ती शक्यतो लाईट शेडमधली तसेच मॅट किंवा क्रिम प्रकारातली लावा. ऑफिसला जाताना एवढा मेकअप केला तरी तो पुरेसा ठरतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नॅचरल लूक देतो.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सस्टायलिंग टिप्स