Lokmat Sakhi >Beauty > हात- पाय खूपच काळपट दिसतात? फक्त १० रुपयांत करा एक खास उपाय- हातापायांवर येईल चमक

हात- पाय खूपच काळपट दिसतात? फक्त १० रुपयांत करा एक खास उपाय- हातापायांवर येईल चमक

Beauty Tips: मेनिक्युअर- पेडिक्युअरसारखा ग्लो घरच्याघरी हवा असेल, तर हा एक सोपा आणि स्वस्तात मस्त उपाय करून पाहा (Home Remedies For Tanned Hands and Feet)...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2023 06:15 PM2023-08-07T18:15:44+5:302023-08-07T18:17:01+5:30

Beauty Tips: मेनिक्युअर- पेडिक्युअरसारखा ग्लो घरच्याघरी हवा असेल, तर हा एक सोपा आणि स्वस्तात मस्त उपाय करून पाहा (Home Remedies For Tanned Hands and Feet)...

How to do manicure pedicure at home? Home remedies for tanned hands and feet jut in 10 rupees, Fastest way to remove tan | हात- पाय खूपच काळपट दिसतात? फक्त १० रुपयांत करा एक खास उपाय- हातापायांवर येईल चमक

हात- पाय खूपच काळपट दिसतात? फक्त १० रुपयांत करा एक खास उपाय- हातापायांवर येईल चमक

Highlightsहा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या चार गोष्टींची गरज लागणार आहे.

चेहऱ्याकडे आपण भरपूर लक्ष देतो. वेगवेगळे फेसपॅक लावून बघतो. शिवाय अनेक घरगुती उपायही नेहमीच चालू असतात. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा छान राहते. अगदी चमकदार, तुकतुकीत दिसते. पण त्याचवेळी हाताकडे आणि पायांकडे मात्र दुर्लक्ष होतं. अशाने मग हळूहळू हात आणि पाय काळे पडत जातात. त्यांच्यावरचं टॅनिंग दिवसेंदिवस वाढत जातं. अनेकींचं वारंवार पार्लरला जाणही होत नाही.  गेलोच तरी पेडिक्युअर- मेनिक्युअर (manicure pedicure at home) या ब्युटी ट्रीटमेंट्स करण्यावर खूप पैसा खर्च करण्याची इच्छा नसते. तुमचंही असंच असेल तर हात आणि पायाची त्वचा उजळविण्यासाठी हा एक स्वस्तात मस्त उपाय करून बघा. (Home remedies for tanned hands and feet).

 

हा उपाय इंस्टाग्रामच्या mysha_beauty_queen या पेजवर सुचविण्यात आला आहे.  हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या चार गोष्टींची गरज लागणार आहे. बघूया या चार गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत.
घरच्याघरी मेनिक्युअर- पेडिक्युअर करण्यासाठी लागणारे साहित्य
१ लिंबू

चिमूटभर हळद

कडू कारल्याचं झटपट चविष्ट लोणचं करण्याची सोपी रेसिपी, कडवटपणा गायब- कारलंही लागेल आवडायला

१ टीस्पून शाम्पू

चिमूटभर कॉफी पावडर

 

घरीच कसं करायचं मेनिक्युअर- पेडिक्युअर?
१. सगळ्यात आधी लिंबू २ भागात कापून घ्या. अर्धे लिंबू एका हातासाठी किंवा पायासाठी आणि दुसरे अर्धे दुसऱ्या हातासाठी किंवा पायासाठी वापरता येईल. 

२. कापलेल्या लिंबाच्या फोडीवर शाम्पू, हळद आणि कॉफी पावडर टाका. 

National Handloom Day: भारतातल्या १० प्रसिद्ध हॅण्डलूम साड्या, सांगा यापैकी किती साड्या तुमच्याकडे आहेत?

३. आता ही लिंबाची फोड काळपट पडलेल्या हातावर- पायांवर घासा. ७ ते ८ मिनिटे घासून झाले की हात- पाय स्वच्छ धुवून घ्या.

४. त्या भागातली त्वचा उजळल्यासारखी वाटेल.

या गोष्टींची काळजी घ्या
१. हात- पायावर छोट्या छोट्या जखमा असतील, फोडं आलेले असतील तर लिंबामुळे त्रास होऊ शकतो. त्या भागात जळजळ होऊ शकते. 

झुरळांमुळे हैराण झालात? घरातल्या फक्त ४ गोष्टी वापरा, झुरळ होतील गायब 

झुरळांमुळे हैराण झालात? घरातल्या फक्त ४ गोष्टी वापरा, झुरळ होतील गायब 

२. त्वचेवर लिंबू लावणे सगळ्यांनाच सहन होते असे नाही. त्यामुळे आधी थोड्या भागात लावून पॅच टेस्ट करा. सहन झाले तरच हा उपाय करा. 


 

Web Title: How to do manicure pedicure at home? Home remedies for tanned hands and feet jut in 10 rupees, Fastest way to remove tan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.