Join us  

केसांना तेल लावून मसाज करण्याच्या सोप्या ५ स्टेप्स, केस होतील मऊ व चमकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 6:08 PM

Simple 5 Steps To Do Scalp Massage For Hair Growth : तेल लावण्याची योग्य पद्धत फॉलो केली तर केसांचा पोत सुधारण्यास निश्चतच त्याचा फायदा होईल....

आजकाल आपल्यापैकी बरेचजण केसांच्या समस्येने हैराण झालेले दिसतात. केसगळती, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे, रुक्ष व निस्तेज दिसणे अशा  केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय विविध प्रकारची केमिकल्स असलेली हेअर प्रोडक्टस यांच्या वापरामुळे केसांची गुणवत्ता खराब होते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच केसांचे पोषण व्हावे म्हणून आपण त्यांना तेलाने मसाज करतो. आपले केस सुंदर दिसण्यासाठी आपण किमान आठवड्यातून दोन वेळा तरी केसांना तेल लावतोच. केसांना वेळोवेळी तेल लावून मसाज व चंपी केल्याने केसांचे आरोग्य सुधारते. 

आपण केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी केसांना तेल तेल तर लावतो, परंतु केसांना तेल लावताना आपण काही चुका करतो. या छोट्याश्या चुकांमुळे देखील केसांचे आरोग्य बिघडू शकते. केसांमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी तेल लावताना काही स्टेप्स आवर्जून फॉलो केल्या तर त्याचा नक्कीच फायदा होतो. आता केसांना तेल लावणे यात काय समजून घेण्यासारखे आहे असे अनेकांना वाटू शकते. मात्र तेल लावण्याची योग्य पद्धत फॉलो केली तर त्याचा केसांचा पोत सुधारण्यास निश्चतच फायदा होईल. बाजारात विविध प्रकारची तेलं येतात. अमक्या तेलामुळे केसांना हा फायदा होईल, तमक्या तेलामुळे केसांची ही समस्या दूर होईल असे अनेक दावे विविध कंपन्यांद्वारे केले जातात. मात्र केसांची उत्तम वाढ व्हावी आणि केस दिर्घकाळ चांगले राहावेत यासाठी आपल्या केसांना सूट होईल अशा कोणत्याही तेलाने पारंपरिक तेल मसाज करणे फायद्याचेच ठरते. पाहूयात केसांना तेल लावण्याच्या महत्त्वाच्या स्टेप्स(How To Do Massage Your Scalp For Hair Growth & Other Benefits).

केसांची तेल मालिश चंपी करण्याच्या काही सोप्या स्टेप्स :- 

१. केसांच्या मसाजसाठी तेल कोमट गरम करून घ्या :- एका वाटीत तेल घेऊन ते कोमट होईपर्यंत गरम करा. तेलाची उष्णता डोक्याचा रक्तप्रवाह वाढण्यास मदत करेल. त्यामुळे केसांची वाढ तर चांगली होईलच पण केसांना आवश्यक ते पोषणही मिळण्यास मदत होईल.

केमिकल शाम्पू लावून लावून केसांचा झाडू झाला? रिठ्याचा ' असा ' करा वापर, केस होतील मऊ चमकदार...

 

२. केस विंचरून त्याची विभागणी करा :- केसांमधील गुंता काढून मध्यभागी भांग पाडा आणि केस दोन भागांत विभागले जातील असे पाहा. हे करण्यासाठी बारीक दातांचा कंगवा न वापरता जास्तीत जास्त मोठ्या दातांचा कंगवा वापरा. म्हणजे केस कंगव्यामध्ये अडकून तुटणार नाहीत आणि गुंता झटपट निघण्यास मदत होईल. 

सतत होणाऱ्या केस गळतीमुळे हैराण ? खोबरेल तेलाचा घरगुती हेअर मास्क वाढवेल केसांचे सौंदर्य...

३. गरम तेलाने मसाज करावा :- डोक्यावर तेल ओता आणि हाताच्या बोटांनी डोक्यात गोलाकार मसाज करा. मसाज करताना खप जोरजोरात करु नका, कारण असे केल्याने केस तुटण्याची आणि गळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हलक्या हाताने मसाज करणे केव्हाही फायद्याचे ठरते. 

४. केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत तेल लावा :- केसांच्या मुळांना भरपूर तेल लावल्यानंतर केसांकडे वळा. हाताच्या तळव्यावर तेल घेऊन दोन्ही हाताच्या मध्यभागी केस धरुन त्यांना तेल लावा. यानंतर केसांच्या टोकांना तेल लावायला वुसरु नका. मुळांपासून टोकांपर्यंत तेल लावल्याने केसांना फाटे फुटणे, केस तुटणे यांपासून आपण दूर राहू शकतो. 

५. केस मोकळे सोडू नका :- आता केसांची हलकी वेणी बांधा आणि ती एक ते दोन तासांसाठी तशीच ठेवून द्या. त्यानंतर हलक्या शॅम्पूने केस धुवा. केस मोकळे सोडण्याची चूक करू नका, त्याऐवजी अंबाडा किंवा वेणी बांधा. यामुळे संपूर्ण केसांमध्ये तेल शोषले जाऊ शकते. केसांना लावलेले तेल रात्रभर ठेवल्याने जास्त फायदा होतो.

मेहेंदी लावूनही पिकलेल्या केसांना हवा तसा रंग येत नाही ? जावेद हबीब सांगतात मेहेंदी लावण्याचे १ खास सिक्रेट...

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स