Lokmat Sakhi >Beauty > पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्येच कशाला जायला हवं? फक्त २ स्टेप्स.. पाय दिसतील खूप सुंदर

पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्येच कशाला जायला हवं? फक्त २ स्टेप्स.. पाय दिसतील खूप सुंदर

Beauty Tips For Pedicure: दिवाळीत घराची आवराआवरी, साफसफाई करून पाय घाण झाले असतील, तर घरच्याघरी पेडिक्युअर करण्याची ही बघा एक सोपी पद्धत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 01:33 PM2022-10-20T13:33:52+5:302022-10-20T13:34:45+5:30

Beauty Tips For Pedicure: दिवाळीत घराची आवराआवरी, साफसफाई करून पाय घाण झाले असतील, तर घरच्याघरी पेडिक्युअर करण्याची ही बघा एक सोपी पद्धत.

How to do pedicure at home, Pedicure in just 2 steps, Home remedies for cracked heels and soft feet | पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्येच कशाला जायला हवं? फक्त २ स्टेप्स.. पाय दिसतील खूप सुंदर

पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्येच कशाला जायला हवं? फक्त २ स्टेप्स.. पाय दिसतील खूप सुंदर

Highlightsघरच्याघरी अशा पद्धतीने पेडिक्युअर (How to do pedicure at home?) करून बघा. पाय इतके स्वच्छ होतील की पेडिक्युअरसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरजच  वाटणार नाही

दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येकीच्या मागेच खूप धावपळ, गडबड, पळापळ असते. घर आवरणे, घरातली सगळी धूळ स्वच्छ  करून साफसफाई करणे, अशी कामं तर दिवाळीच्या ८- १५ दिवस आधीच सुरू होतात. असं सगळं केल्यानंतर घर तर स्वच्छ  होतंच, पण ती स्वच्छता करणाऱ्या महिला मात्र अस्वच्छ होऊन जातात. घरातली, बाहेरची काम करून- करून  पाय थकून  जातात. म्हणूनच थकलेल्या पायांना थोडं रिलॅक्स करण्यासाठी आणि अस्वच्छ, घाण झालेले पाय स्वच्छ,  कोमल  करण्यासाठी  घरच्याघरी अशा पद्धतीने पेडिक्युअर (How to do pedicure at home?) करून बघा. पाय इतके स्वच्छ होतील की पेडिक्युअरसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरजच  वाटणार नाही (Pedicure in just 2 steps). 

 

घरच्याघरी पेडिक्युअर करण्याची पद्धत
१. आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेलं सामान वापरून घरीच सोप्या पद्धतीने पेडिक्युअर कसं करायचं, याविषयीच्या ब्यूटी टिप्स इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत. 

"मी तैमूरला सांभाळतो, करिना शूटिंगला गेली आणि..", सैफ सांगतो शर्मिला टागोर यांनी दिलेल्या शिकवणुकीविषयी..

२. यासाठी आपल्याला पाणी, २ लिंबांचा रस, १ टीस्पून मीठ, १ टीस्पून बेकींग सोडा, १ टीस्पून हळद आणि १ टीस्पून कोणताही शाम्पू लागणार आहे.

३. सगळ्यात आधी एक ग्लास पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. 

४. त्यानंतर त्या पाण्यात मीठ टाका. लिंबूही पिळा आणि लिंबाची सालंही त्याच पाण्यात टाकून द्या. तसेच हळद टाका.

५. पाण्याला चांगली उकळी आली की हे उकळतं पाणी अर्धी बादली काेमट पाण्यात टाका. त्यानंतर त्यात बेकींग सोडा, शाम्पू घाला.

 

६. या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवा.

७. त्यानंतर स्क्रबर घेऊन पाय घासून घ्या.

पणत्या सुंदर रंगवण्याच्या १० आकर्षक आयडिया, पणत्या दिसतील सुंदर- देखण्या

८. पाय घासून झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवा, पुसून कोरडे करा आणि नंतर त्याला व्हॅसलिन किंवा मॉईश्चरायझर लावा.  

९. पाय स्वच्छ आणि मऊ होतील.  

 

 

Web Title: How to do pedicure at home, Pedicure in just 2 steps, Home remedies for cracked heels and soft feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.