Lokmat Sakhi >Beauty > साडी अंगावर खूप फुगलेली दिसते- निऱ्या घालताना गोंधळ होतो, १ सोपी ट्रिक- दिसाल स्मार्ट- आकर्षक 

साडी अंगावर खूप फुगलेली दिसते- निऱ्या घालताना गोंधळ होतो, १ सोपी ट्रिक- दिसाल स्मार्ट- आकर्षक 

Saree Draping Tips: साडीच्या निऱ्या कशा योग्य पद्धतीने घालायच्या, जेणेकरून साडीमध्ये फिगर अगदी आकर्षक दिसेल आणि साडीही कॅरी करायला सोपी जाईल, ते आता पाहूया...(simple tips to drape hip pleats)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2023 12:58 PM2023-09-05T12:58:27+5:302023-09-05T13:22:30+5:30

Saree Draping Tips: साडीच्या निऱ्या कशा योग्य पद्धतीने घालायच्या, जेणेकरून साडीमध्ये फिगर अगदी आकर्षक दिसेल आणि साडीही कॅरी करायला सोपी जाईल, ते आता पाहूया...(simple tips to drape hip pleats)

How to do Perfect hip pleats? simple tips to drape hip pleats? How to wear saree to look slim and tall? | साडी अंगावर खूप फुगलेली दिसते- निऱ्या घालताना गोंधळ होतो, १ सोपी ट्रिक- दिसाल स्मार्ट- आकर्षक 

साडी अंगावर खूप फुगलेली दिसते- निऱ्या घालताना गोंधळ होतो, १ सोपी ट्रिक- दिसाल स्मार्ट- आकर्षक 

Highlightsयामुळे साडी फुगलेली दिसणार नाही. तुमची फिगरही व्यवस्थित दिसेल. शिवाय साडी चापून चोपून नेसल्याने ती सांभाळणं फारसं कठीण जाणार नाही

एरवी अनेक जणी जीन्स, कुर्ता- पायजमा अशा कपड्यांमध्ये वावरत असल्या तरी वेळप्रसंगी, लग्नसमारंभात हमखास साडी नेसली जाते. किंवा नेसावीशी वाटते. आता कधी नव्हे ती साडी नेसायची म्हणजे मग अनेक जणींचा गोंधळ उडतो. एकतर साडी नेसल्यावर काही जणींना काम सुचत नाही. कारण साडी सांभाळण्यातच वेळ जातो. काही जणींना निऱ्या नीट घालता येत नाहीत. त्यामुळे मग साडी फुगल्यासारखी दिसते (How to do Perfect hip pleats?). तुमचंही असंच होत असेल तर निऱ्या घालण्याची ही ट्रिक समजून घ्या. यामुळे साडी फुगलेली दिसणार नाही. तुमची फिगरही व्यवस्थित दिसेल. शिवाय साडी चापून चोपून नेसल्याने ती सांभाळणं फारसं कठीण जाणार नाही (How to wear saree to look slim and tall?).

 

साडीच्या निऱ्या घालण्याची स्मार्ट पद्धत
या संदर्भातला एक व्हिडिओ ankitasingh662001 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. जेव्हा तुम्ही निऱ्या घालायला सुरुवात करता त्याच्या आधी डाव्या बाजूने जो साडीचा काठ असतो तो थोडा ओढून तिरका करा आणि साडीच्या आतल्या बाजुला तसेच पेटीकोटला पिनअप करा.

आरामात टीव्ही पाहत बसा, तरी होईल सुटलेलं पोट कमी! कसं? - करा फक्त १ सोपी गोष्ट

आता तोच काठ त्याच दिशेने आणखी थोडा पुढे ओढा आणि थोडासा पिळ देऊन उजव्या बाजुला खोचा. असे केल्यावर डाव्या बाजुने साडी छान चापून चोपून बसली जाईल. आता उजव्या बाजुने लहान लहान प्लेट घेऊन निऱ्या घाला आणि आपण लावलेली पिन व्यवस्थित झाकली जाईल, अशा पद्धतीने खोचून घ्या. 


 

Web Title: How to do Perfect hip pleats? simple tips to drape hip pleats? How to wear saree to look slim and tall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.