Lokmat Sakhi >Beauty > शरीराप्रमाणेच केसांना द्या प्रोटीनचा खास डोस, फक्त ५ पदार्थ, करा पार्लरसारखी प्रोटीन ट्रीटमेंट घरच्याघरीच...

शरीराप्रमाणेच केसांना द्या प्रोटीनचा खास डोस, फक्त ५ पदार्थ, करा पार्लरसारखी प्रोटीन ट्रीटमेंट घरच्याघरीच...

Do a Parlor Like Protein Treatment At Home : Just 5 Foods Needed For Protein Hair Treatment At Home : How to do salon protein treatment at home : पार्लर किंवा हेअर क्लिनिकमधील प्रोटीन ट्रीटमेंट महागडी वाटत असली तरी, घरातल्या घरात अगदी स्वस्तात करता येते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2025 16:22 IST2025-01-11T16:05:23+5:302025-01-11T16:22:20+5:30

Do a Parlor Like Protein Treatment At Home : Just 5 Foods Needed For Protein Hair Treatment At Home : How to do salon protein treatment at home : पार्लर किंवा हेअर क्लिनिकमधील प्रोटीन ट्रीटमेंट महागडी वाटत असली तरी, घरातल्या घरात अगदी स्वस्तात करता येते.

How to do salon protein treatment at home Do a Parlor Like Protein Treatment At Home Just 5 Foods Needed For Protein Hair Treatment At Home | शरीराप्रमाणेच केसांना द्या प्रोटीनचा खास डोस, फक्त ५ पदार्थ, करा पार्लरसारखी प्रोटीन ट्रीटमेंट घरच्याघरीच...

शरीराप्रमाणेच केसांना द्या प्रोटीनचा खास डोस, फक्त ५ पदार्थ, करा पार्लरसारखी प्रोटीन ट्रीटमेंट घरच्याघरीच...

केसांचे आरोग्य आणि सौंदर्य उत्तम राहावे यासाठी आपण केसांची विशेष काळजी घेतो. शरीरातील इतर अवयवांप्रमाणे केसांची मुळं ही देखील केसांना आहार आणि रक्तप्रवाह याद्वारे (Just 5 Foods Needed For Protein Hair Treatment At Home ) पोषण मिळवून देतात. आपल्या शारीरिक वाढीसाठी जसे प्रोटीन आवश्यक असते त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी देखील प्रोटीन तितकच  आवश्यक असत(Do a Parlor Like Protein Treatment At Home).

आपल्या केसांनाही प्रोटीन्स मिळण्याची आवश्यकता असते. मात्र आपल्याला याची कल्पना नसल्याने आपण केसांना प्रोटीन मिळावे म्हणून वेगळे काही प्रयत्न करत नाही. पण केसांची चांगली वाढ व्हावी, ते दाट व्हावेत आणि दिर्घकाळ काळेभोर राहावेत यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. आपले केस हे मुळातच प्रोटीन्सपासून तयार झालेले असतात आणि त्याची (How to do salon protein treatment at home) कमतरता झाल्यास ते रुक्ष आणि निर्जीव दिसायला लागतात. केसांचा पोत सुधारावा किंवा त्यांना पोषण मिळावे यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या स्पा किंवा प्रोटीन ट्रिटमेंट घेतो. पण यासाठी बराच पैसा आणि वेळ खर्च होतो. त्यापेक्षा घरच्या घरी काही नैसर्गिक पद्धतींनी प्रोटीन ट्रिटमेंट कशी करता येईल पाहूयात. 

केसांसाठी प्रोटीन मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. अळशीच्या बिया - ३ टेबलस्पून 
२. तांदूळ - १/२ कप 
३. मेथी दाणे - २ टेबलस्पून 
४. खोबरेल तेल - २ टेबलस्पून 
५. पाणी - १/२ कप 

चेहऱ्याला बेसन लावताना दुधात कालवावे की दह्यात? बघा नक्की काय लावल्याने चमकतो चेहरा...

केसांसाठी प्रोटीन मास्क कसा तयार करायचा ?

सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात अळशीच्या बिया, तांदूळ, मेथी दाणे घालून ५ ते ७ मिनिटे हलकेच एक उकळी काढून घ्यावी. उकळी आल्यावर सर्व साहित्य ग्राइंडरच्या भांड्यात ओतावे आणि एक ग्लास पाणी घालून त्याची बारीक आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका सुती कपड्यात घालून ती चांगली पिळून घ्या. प्रोटीन पेस्ट पूर्णपणे बाहेर येईपर्यंत तू व्यवस्थित पिळून घ्या. आता या पेस्टमध्ये खोबरेल तेल घाला. अशाप्रकारे केसांसाठी होममेड प्रोटीन हेअर मास्क वापरण्यासाठी तयार आहे. 

थंडीत त्वचेवर हवा गुलाबी ग्लो? महागडे उपाय कशाला, फक्त ४ प्रकारे बिट लावा, पाहा जादू...

होममेड प्रोटीन हेअर मास्क केसांना कसा लावावा? 

सर्वात आधी तुमच्या केसांचा गुंता व्यवस्थित सोडवून केसांचे दोन भागात विभाजन करा. त्यानंतर एखाद्या हेअर ब्रशच्या मदतीने हा तयार होममेड प्रोटीन हेअर मास्क केसांवर  लावून घ्यावा. हा प्रोटीन मास्क केसांच्या तळापासून वर डोक्यापर्यंत लावायला सुरुवात करा. हा मास्क लावल्यानंतर ३० ते  ४० मिनिटांनंतर केस फक्त पाण्याने धुवा. आठवड्यातून जितके दिवस आपण केस धुता तितके दिवस हा मास्क केसांना लावा. 

मध -साखर नको, फक्त वाटीभर लिंबाचा रस वापरुन घरच्याघरी वॅक्सिंग करण्याची नवी पद्धत...

प्रोटीन हेअर मास्कचे फायदे काय?

घरच्याघरी केसांची प्रोटीन ट्रीटमेण्ट करताना जो प्रोटीन हेअर मास्क लावला जातो त्याचे अनेक फायदे होतात. 

१. प्रोटीन हेअर मास्कमधील खोबरेल तेलामुळे केसांना आर्द्रता मिळते आणि केस कोरडे पडत नाही. 

२. ॲण्टिऑक्सिडण्ट आणि  इतर पोषक घटकांमुळे या मास्कचा उपयोग केस मजबूत आणि आरोग्यदायी होण्यासाठी केला जातो. 

३. प्रोटीन हेअर मास्कमुळे केसांच्या सर्व समस्या दूर होवून केसांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होते. 

४. मास्कमधील मधामुळे केसांचा रुक्षपणा, केस गळती या समस्या सहज दूर होतात.

Web Title: How to do salon protein treatment at home Do a Parlor Like Protein Treatment At Home Just 5 Foods Needed For Protein Hair Treatment At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.