सगळ्याच महिला आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी हेअर स्पा ट्रीटमेंट घेत असतात (Hair Care Tips) स्पा करायचं म्हचलं की एकावेळी ७०० ते १५०० रूपये जातात. अनेकदा स्पा केल्यानंतर हेअर स्पा करूनही ३-४ दिवस पुन्हा केस खराब दिसतात. पार्लरला न जाता तुम्ही घरीच केळी हेअर स्पा सहज करू शकता. (How to do hair spa naturally) या लेखात तुम्हाला घरीच हेअर स्पा करण्याची पद्धत सांगणार आहोत. (How to do banana hair spa at home)
हेअर स्पा (Hair Spa) हा एक प्रकारची ब्यूटी ट्रिटमेंट आहे. ज्यामध्ये केळीची क्रीम, मसाज आणि स्टीमची मदत घेतली जाते. हे केसांना प्रदूषक किंवा रसायनांपासून दूर ठेवते आणि टाळूची स्थिती ठेवते. शिवाय, केस निरोगी, मजबूत आणि चमकदार बनवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. (How To Do Hair Spa Treatment At Home In 5 Easy Steps)
साहित्य
१/२- केळी, ३ टीस्पून - मध, १ अंडे, १ कप - दही, २ टीस्पून - नारळ तेल
स्पा क्रीम बनवण्यासाठी आधी अर्धी केळी, मध, अंडी आणि १ कप दही एका भांड्यात टाका. नंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. आता ही पेस्ट एका भांड्यात काढा आणि आता त्यात २ चमचे खोबरेल तेल घाला. तुमची होममेड हेअर स्पा क्रीम तयार आहे.
स्पा घरी करण्याची पद्धत (Spa at home steps)
सर्व प्रथम, केसांचे ४ भाग केल्यानंतर तेल लावा आणि सुमारे 15 ते 20 मिनिटे केसांना मसाज करा. आता केसांवर वाफ घ्या. गरम पाणी आणि टॉवेल वापरून तुम्ही घरी केसांची वाफ घेऊ शकता. वाफ घेतल्यानंतर, आपले डोके गरम टॉवेलने झाकून ठेवा आणि 15 ते 20 मिनिटे सोडा मग केस धुवा. यासाठी तुम्ही सौम्य शैम्पू वापरू शकता. घरी सलून सारख्या केसांच्या ट्रिटमेंटची शेवटची पायरी म्हणजे हेअर मास्क लावणे.
ग्लोईंग स्किनसाठी कतरिना करते ५ गोष्टी; वयाच्या ३८व्या वर्षीही तरुण दिसण्याचं ब्यूटी सिक्रेट
केळीपासून बनवलेला हेअर मास्क वापरा. सौम्य मसाज करण्याच्या साधनाने किंवा हाताने, सर्व डोक्यावर समान रीतीने मास्क लावा. 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने पूर्णपणे धुवा. हेअर स्पा घरी करण्याच्या या बेसिक स्टेप्स आहेत.
केसांना वाफ देण्याची पद्धत (How to steam hair at home)
तुम्हाला फक्त कोमट पाणी करायचे आहे. त्यानंतर, त्यात एक टॉवेल भिजवा आणि हलका पिळून घ्या आणि केसांना गुंडाळा. केसांवर 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ गुंडाळण्याची आवश्यकता नाही. स्टीम घेताना हे लक्षात ठेवा की पाणी जास्त गरम नसावे कारण त्यामुळे केस खराब होऊ शकतात. केसांना तेल लावताना हलक्या हातांनी मसाज करा. त्यापूर्वी केस चांगले धुवा, यापूर्वी पाण्याच्या तापमानाकडे लक्ष द्या. क्रीम लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.