सुंदर आणि आकर्षक काळ्याभोर डोळ्यांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलून येते. संपूर्ण चेहऱ्यात डोळे अधिक उठून दिसण्यासाठी बहुतेक महिला डोळ्यांचा आयमेकअप करायला विसरत नाहीत. डोळ्यांना मेकअप करण्यासाठी आपण काजळ, आयलायनर, आयशॅडो, मस्कारा अशा अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. हे सगळे ब्यूटी प्रॉडक्ट्स आपण शक्यतो बाजारातून विकत आणतो. हे ब्यूटी प्रॉडक्ट्स अनेकदा मोठ्या प्रसिद्ध ब्रँडचेच असतात, त्यामुळे हे फार महागडे असतात. यासोबतच हे प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी अनेक केमिकल्सयुक्त रसायनांचा वापर केला जातो(simple recipe to make DIY eyeliners at home).
डोळ्यांच्या नाजूक त्वचेवर या केमिकलयुक्त आयलायनरचा वापर खूप हानिकारक ठरू शकतो. आय मेकअप करताना आयलायनरला विशेष महत्त्व असते. यासाठीच असे केमिकल्सयुक्त आयलायनर वापरण्यापेक्षा नॅचरल पद्धतीने (How to do the perfect natural eyeliner at home) तयार केलेले आयलायनर वापरणे हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. अशावेळी आपण सगळ्यांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या कापूस आणि चमचाभर जिऱ्याचा वापर करून झटपट घरगुती नॅचरल आयलायनर तयार करु शकतो. घरच्याघरीच हे होममेड वॉटरप्रूफ आयलायनर कसे तयार करायचे त्याची सोपी कृती पाहूयात(How to make natural eyeliner at home).
होममेड आयलायनर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. कापूस - छोटासा तुकडा २. जिरं - १ टेबलस्पून ३. तूप - २ टेबलस्पून ४. छोटीशी पणती - १ मध्यम आकाराची पणती ५. स्टीलचे ताट - १६. खोबरेल तेल - ४ ते ५ थेंब
फक्त १ टेबलस्पून चिया सीड्सचे करा केसांसाठी कंडिशनर- एका धुण्यात केस होतील सिल्की आणि चमकदार...
लग्न ठरलंय-चेहऱ्यावर हवा सिलेब्रिटींसारखा ग्लो? वापरा 'हा' खास फेसमास्क, ब्रायडल ग्लो येईल...
होममेड आयलायनर तयार करण्याची कृती :-
१. सगळ्यांतआधी कापसाची एक लांब आयताकृती पट्टी घ्यावी त्यावर चमचाभर जिरे पसरवून घालावे. २. जिरे या कापसाच्या पट्टीवर पसरवून घातल्यानंतर या कापसाची पट्टी गोल गुंडाळून त्याची सुरनळी करुन घ्यावी. ३. आता अशा ५ ते ६ सुरनळी एकत्रित तयार करून घ्याव्यात, त्यानंतर एक - एक सुरनळी हातात घेऊन त्यावर दाब देत वाती सारखी वळून घ्यावी. ४. आता या सगळ्या वाती एका मातीच्या पणतीमध्ये गोलाकार व्यवस्थित मांडून ठेवाव्यात.
गरबा खेळून घाम येतो - मेकअप पसरू नये म्हणून 'असा ' करा वॉटरप्रूफ मेकअपबेस...
कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय...
५. त्यानंतर या पणतीच्या बरोबर मध्यभागी तूप घालावे आणि सगळ्या वाती पेटवाव्यात. ६. या जळत्या दिव्यावर एक स्टीलचे ताट ठेवावे ठेवावे. दिवा जळून या स्टीलच्या ताटावर काळ्या रंगाची काजळी तयार होईल. ७. ही ताटावर तयार झालेली काजळी चमच्याने खरवडून एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. ८. आता या बाऊलमध्ये जमा केलेल्या काजळीमध्ये ४ ते ५ थेंब खोबरेल तेल घालून त्याचे लिक्विड होईपर्यंत ब्रशच्या मदतीने हलवून घ्यावे. ९. तयार झालेले हे घरगुती वॉटरप्रूफ आयलायनर एका काचेच्या बाटलीत स्टोअर करुन ठेवावे.
अशा प्रकारे आपण केमिकल्स फ्री होममेड आयलायनर घरच्या घरीच तयार करु शकतो.