सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाण्याच्या घाईत मुली ओले केस नीट न सुकवता तश्यात केसांची हेअरस्टाईल करतात. पण आंघोळीनंतर आपले केस अधिक कमकुवत होतात. केस नीट वाळवले नाहीत तर बरेचसे केस गळू शकतात. केस चुकीच्या पद्धतीनं घासल्यानं केस मधूनच तुटतात. (How To Dry Hair Quickly) त्यामुळे केस नीट वाळवायला हवेत जेणेकरून त्यांना कोणतेही नुकसान होणार नाही. समजून घेऊया केस सुकवण्याची योग्य पद्धत. (Best way to dry up hairs)
1) हाताने पिळून घ्या
ओले केस हाताने पिळून घ्या आणि नंतर टॉवेल वापरा. ओले केस वळवू नका. असे केल्याने केस तुटतात. सगळ्यात आधी हातानं केस झटकून पाणी काढून घ्या.
2) जाड टॉवेलचा वापर करू नका
केस पुसण्यासाठी जाड टॉवेल वापरू नका. जाड टॉवेल वापरल्याने केस कुजतात आणि कमकुवत होतात आणि तुटायला लागतात. तसंच केस ओले असताना ते टॉवेलने घासू नका. त्याऐवजी केसांची टोकं खाली धरा आणि त्यातून पाणी पिळून घ्या.
३) मसाज
ओल्या केसांमधील पाणी काढून टाकल्यानंतर हातांनी केसांना मसाज करा. असे केल्याने केसांच्या मुळांमध्ये रक्तप्रवाह जलद होतो आणि केसांची वाढ चांगली होते.
४) हेअर सीरम
हातात थोडेसे हेअर सीरम घ्या आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. हेअर सीरम लावल्याने केसांचे संरक्षण होते. हेअर सिरम लावल्यानं केस सेट होण्यास मदत होईल. अनेकांचे केस सुकल्यानंतर कसेतरी, विस्कटलेले दिसतात. हेअर सिरम लावल्यानं केस बराचवेळ चांगले राहतात.
हेअर ड्रायरचा वापर शक्यतो टाळा
केस पटकन सुकवण्यासाठी अनेकजणी ड्रायर वापरतात. पण ड्रायरच्या अति वापरानं केस कमकुवत व्हायला सुरूवात होते तर काहींना केसांमध्ये फाटे फुटल्याची समस्या उद्भवली आहे. जर वापरत असाल तर ड्रायर केसांच्या अगदी जवळ नेऊ नका. इतर हिटिंग टूल्सप्रमाणेच ड्रायरच्या अति गरम हवेमुळेही केसांच्या मुळांवर परिणाम होऊ शकतो.