Join us  

पावसात भिजल्याने केस ओलेचिंब-चिकट झाले? केस झटपट कोरडे करण्याच्या सोप्या ट्रिक्स, केसही गळणार नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 5:41 PM

How to dry your hair in humid weather : 6 Hair Care Tips For Humid Weather : पावसाळ्यात शक्यतो केस ओले झाले तर ते लगेच कसे वाळवावेत याच्या काही ट्रिक्स...

अनेकदा आपण मुसळदार कोसळणाऱ्या पावसात भिजतो. पावसात भिजल्याने पावसाच्या पाण्याने केस ओले - चिंब होतात. असे ओले - चिंब भिजलेले केस सुकवणे मोठे कठीण काम असते. जर आपण हे ओले केस न सुकवता आहेत तसेच ठेवले तर केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यात शक्यतो वातावरणातील ओलावा आणि आर्द्रतेमुळे केस असो किंवा कपडे लगेच वाळत नाहीत. असे केस किंवा कपडे ओलेच राहिले तर त्यातून एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येऊ लागते. पावसाळ्यात केस नैसर्गिकरित्या सुकवणे हा खूप मोठा टास्कच असतो(How to dry your hair in humid weather naturally).

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केसांसंबधित अनेक समस्या वाढतात. पावसाळयात बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा पावसात भिजल्याने केस चिकट आणि खराब होतात. या चिकट केसांची योग्यरीत्या काळजी घेतली नाही तर केस गळती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो केस ओले झाले तर ते लगेच वाळवावे लागतात. परंतु अशावेळी हे ओले केस नेमके कसे वाळवावेत याच्या सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात( 6 Hair Care Tips For Humid Weather).

पावसाळ्यात ओले केस कसे वाळवावेत ? 

१. टॉवेलने काळजीपूर्वक केस वाळवा :- पावसाळ्यात ओले केस वाळवणे फार महत्वाचे असते. पावसात केस भिजल्यानंतर ते वाळवण्यासाठी शक्यतो मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करावा. मायक्रोफायबर कापड असलेल्या टॉवेलचा वापर केल्याने टॉवेल आणि केसांमध्ये घर्षण कमी होते. यामुळे केस तुटण्याची किंवा गळण्याच्या समस्येचे प्रमाण कमी होते. ओले केस वाळवण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल किंवा कॉटनचा टी - शर्ट वापरावा जो केसांसाठी  हलका असतो. 

२. टॉवेलने केस घासू नका :- ओले झालेले केस पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करताना केस घासून पुसू नका. केस घासून पुसण्याऐवजी जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी ते हळूवारपणे पिळून घ्या. यामुळे केस व्यवस्थित पुसून सुकवून घ्यावेत. केस तुटण्याचे आणि गळण्याचे प्रमाण कमी होते. 

३. लीव्ह-इन कंडिशनर वापरा :- केस वाळल्यानंतर केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी लीव्ह-इन कंडिशनर वापरावे. ओल्या केसांतील ओलावा आणि फ्रिजीनेस कमी करण्यासाठी लीव्ह-इन कंडिशनरचा वापर करावा. 

श्रावण स्पेशल : फक्त तासाभर लावा हातावर मेहेंदी, रंगेल लालचुटूक-रात्रभर न ठेवताही खुलेल रंग...

४. केसांसाठी हेअर ड्रायरचा वापर करणे :- केसांसाठी हेअर ड्रायरचा वापर करून आपण ओले केस व्यवस्थित वाळवू शकतो. केसांवर कोणत्याही हिटिंग टूल्सचा वापर करण्याआधी केस ७० ते ८० टक्के नैसर्गिक हवेत वाळवून घ्यावेत. यामुळे केसांवर हिट एक्स्पोजरचा वेळ कमी होतो यामुळे केसांचे फारसे नुकसान होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही ओले केस व्यवस्थित वाळवू शकता. 

५. ब्लो ड्रायर :- ओले केस वाळवण्यासाठी आपण ब्लो ड्रायरचा वापर करु शकता. ब्लो ड्रायरचा वापर करून ओले केस व्यवस्थित सुकण्यास मदत मिळते. 

नेल आर्ट-मॅनिक्युअर करण्याची गरज नाही, सुंदर नखांसाठी फक्त खाण्यात ‘हे’ सोपे बदल करा...

६. केसांचे विभाजन करा :- ओले केस अधिक लवकर सुकवण्यासाठी केसांचे लहान लहान भागात विभाजन करून केस सुकवावेत. कंगव्याच्या मदतीने थोडे थोडे केस घेऊन ते नैसर्गिक पद्धतीने सुकवावेत.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी