Lokmat Sakhi >Beauty > कांद्याच्या रसात मिसळा १ तेल; दाट- काळेभोर आणि लांबसडक सुंदर होतील केस फक्त काहीच दिवसांत

कांद्याच्या रसात मिसळा १ तेल; दाट- काळेभोर आणि लांबसडक सुंदर होतील केस फक्त काहीच दिवसांत

How to extract onion juice and use it for hair growth : प्रत्येकीला लांब आणि दाट केस हवे असतात; यासाठी १ घरगुती खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2024 02:02 PM2024-11-24T14:02:16+5:302024-11-24T14:03:08+5:30

How to extract onion juice and use it for hair growth : प्रत्येकीला लांब आणि दाट केस हवे असतात; यासाठी १ घरगुती खास उपाय

How to extract onion juice and use it for hair growth | कांद्याच्या रसात मिसळा १ तेल; दाट- काळेभोर आणि लांबसडक सुंदर होतील केस फक्त काहीच दिवसांत

कांद्याच्या रसात मिसळा १ तेल; दाट- काळेभोर आणि लांबसडक सुंदर होतील केस फक्त काहीच दिवसांत

बहुतांश महिलांना लांबसडक केस (Hair Growth) आवडतात. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांची निगा (Hair Care Tips) राखणं अवघड होऊन जातं. केस गळतात, पांढरे होतात किंवा केसांची वाढ (Hair Growth) खुंटते. केस हे महिलांचे सौंदर्यात भर देते. पण जर केसांची वाढच खुंटली तर? केसांसाठी नैसर्गिक उपाय म्हणून आपण खोबरेल तेलाचा वापर करतो. पण फक्त खोबरेल तेलाचा वापर केल्याने केसांच्या समस्या सुटतीलच असं नाही.

आजकाल बऱ्याच उत्पादनांमध्ये हानिकारक रसायने असतात. जे केसांच्या वाढीस योग्य मानले जात नाही. जर केसांची वाढ खुंटली असेल आणि आपल्याला केस कंबरेपर्यंत लांब हवे असतील तर, काही घरगुती उपायांची मदत घेऊन पाहा. यामुळे नक्कीच केसांची वाढ होईल. शिवाय नैसर्गिक उपायांमुळे केस गळतीही थांबेल(How to extract onion juice and use it for hair growth).

युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांच्या वाढीला गती देते. यासाठी एका वाटीत समप्रमाणात कांद्याचा रस आणि खोबरेल तेल घेऊन मिक्स करा. आपण यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल देखील घालू शकता. सर्व काही एकत्र मिसळा आणि केसांना लावून स्काल्पवर मसाज करा. या उपायामुळे केसांची वाढ लवकर होईल. कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांसाठी खूप चांगले आहे. याशिवाय कांद्यामध्ये आढळणारे अँटी-फंगल गुणधर्म केसांमधील कोंडा दूर करतात.

मेथी पेस्ट

दह्यात कांदा घालून खाता? मग गॅसेसचा त्रास होणारच; दही - कांदा एकत्र खात असाल तर..

केसांसाठी मेथी दाणे खूप फायदेशीर ठरते. मेथीमध्ये असलेले प्रोटीन केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे केसांची वाढ वेगवान होते. यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्या त्यात मेथी दाणे भिजत ठेवा. सकाळी मेथी दाण्यांची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट स्काल्प आणि केसांना लावा. नंतर शाम्पूने केस धुवा. यामुळे केस वाढतील.

कोरफड आणि कांद्याचा रस

कोरफड आणि कांद्याचा रस दोन्ही केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यासाठी एका कपमध्ये एलोवेरा जेल घ्या. त्यात ४ चमचे कांद्याचा रस मिसळा. तयार मिश्रण स्काल्प आणि केसांना लावा. काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर केस धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा केला जाऊ शकतो. यामुळे केस भरभर वाढतील. 

Web Title: How to extract onion juice and use it for hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.