रोज केस विंचरताना गळतात, कंगव्यात केसांचे पुंजके अडकतात म्हणून अनेकांना केस विंचरण्याचा पण कंटाळा येतो. (Hair Growth Tips) केस विंचरणं टाळण्यापेक्षा तुम्ही काही सोपे उपाय करून केस वाढवू शकता आणि केसांचा लूकही खुलवू शकतात. (Beauty Tips)अनेकजण केस वाढवण्यासाठी केमिकल्सयुक्त शॅम्पू, हेअरपॅकचा वापर करतात पण त्याचा तात्पुरता फरक दिसतो. (How To Apply Fenugreek Seeds In Hairs)
केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी काही घरगुती उपाय सुरूवातीपासूनच करायला हवेत जेणेकरून केस गळणं वाढणार नाही. केमिकल्सयुक्त त्वचेसाठी मेथी नुकसानकारक ठरते. अशा स्थिती तुम्ही मेथीचा उपयोग करून केस लांबसडक, दाट बनवू शकता. (Ref) मेथीमुळे फक्त केसांची वाढच होत नाही तर केस नैसर्गिकरित्या काळे होण्यासही मदत होते. मेथीचे दाणे केसांना लावण्यासाठी अर्धा कप नारळाच्या तेलात २ चमचे मेथीचे तेल घालून शिजवून घ्या. त्यानतर मेथीच्या तेलाने केसांच्या मुळांची व्यवस्थित मसाज करा. ज्यामुळे केस दाट-मजबूत होण्यास मदत होईल.
सतत केस गळत असतील तर २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी या दाण्यांची पेस्ट बनवून घ्या ही मेथीची पेस्ट केसांना लावून अर्धा तास ठेवा त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.
प्रोटीनसाठी महागड्या गोेष्टी परवडत नाहीत? फक्त १० रुपयांत खा ३ प्रोटीन पदार्थ- हाडं होतील बळकट
केस कोरडे झाले असतील तर मेथीच्या दाण्यांचा हेअर मास्क केसांवर वापरा ज्यामुळे केस मऊ आणि मुलायम होतील. एका वाटीत २ चमचे दही घ्या त्यात मेथीचे दाणे वाटून घ्या दह्यात तुम्ही एक चमचा मेथीची पावडर घालू शकता. यात एक चमचा नारळ तेलसुद्धा मिसळा. डोक्यावर हेअर मास्क अर्धा तास लावून ठेवा नंतर केस स्वच्छ धुवा. या उपायाने केस मऊ-मुलायम होण्यास मदत होईल.
पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी मेथी फायदेशीर (How Fenugreek Is Beneficial For Hairs)
मेथीमुळे केसांना नैसर्गिक काळा रंग देखील येतो. हेअर ऑईलमध्ये मेथी मिसळून ही पेस्ट केसांना लावल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होता. मेथी केसांना मऊ, मुलायम आणि चमकदार बनवते. मेथीमुळे केस गळणं कमी होतं. मेथी नारळाच्या तेलात मिसळून जवळपास १ महिना तुम्ही ही पेस्ट केसांना लावू शकता.