प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार हा वेगवेगळा असतो. कुणाची त्वचा ड्राय, तर कुणाची ऑयली असते. याचबरोबर कुणाची संवेदनशील तर कुणाची मिश्र त्वचा असते. व्यक्तिगणिक त्वचेचे प्रकार (How to Check Your Skin Type for Effective Skincare) हे बदलत जातात. प्रत्येक स्किन टाइपनुसार त्याची काळजी देखील वेगवेगळ्या (How to Know Your Skin Type at Home) पद्धतीने घ्यावी लागते. आपल्या स्किनची काळजी आपण सगळेच काळजीपूर्वक घेतो, परंतु स्किनची योग्य ती काळजी घेण्यासाठी स्किन टाइपनुसार, त्वचेला सूट होतील अशा स्किन प्रॉडक्ट्सचा वापर करणे गरजेचे असते(How To Find Your Skin Type).
आपल्या त्वचेसाठी योग्य स्किन प्रॉडक्ट्सचा वापर करण्यासाठी सर्वात आधी आपला स्किन टाइप जाणून घेणे अतिशय गरजेचे असते. आपल्यापैकी बऱ्याचजणींना त्यांचा स्किन टाईप माहित नसतो. अचूक स्किन टाइप माहित नसल्याने अनेकदा आपण नकळतपणे त्वचेसाठी चुकीच्या प्रॉडक्ट्सचा वापर करतो. अशाप्रकारे आपला स्किन टाइप अचूक न ओळखून चुकीच्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स वापरल्यास त्वचेचे प्रॉब्लेम्स कमी होण्याऐवजी वाढतातच. यासाठी आपला अचूक स्किन टाइप कसा ओळखावा ते पाहूयात.
स्किन टाईप ओळखण्यासाठी घ्या टिश्यू पेपर टेस्ट...
आपली त्वचा कशी आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला घरबसल्या एक सोपी टेस्ट करायची आहे. पण ती योग्य वेळी करणं खूप गरजेचं आहे. सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठता, तेव्हा इतर कोणतीही कामे करण्यापुर्वी टिश्यू पेपरच्या साहाय्याने ही टेस्ट करा. सकाळी उठून सर्वात आधी एखाद्या चांगल्या क्वालिटीच्या माइल्ड क्लिंजरने चेहरा धुवून स्वच्छ करा. त्यानंतर आपल्या चेहऱ्याचा 'T' झोन म्हणजेच कपाळ आणि नाक इथला भाग, तसेच 'U' झोन म्हणजेच ओठांखालचा हनुवटीकडचा भाग या दोन्ही भागांवर आपल्याला टिश्यू पेपर ठेवून टेस्ट घ्याची आहे. फेसवॉश केल्यानंतर साधारणपणे एका तासानंतर तुम्हाला ही टिश्यू पेपर टेस्ट करायची आहे. यासाठी २ टिश्यू पेपर घेऊन ते चेहऱ्याच्या 'T' झोन आणि 'U' झोन वरती ठेवा.
अंगणातील लालचुटुक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांना मिळेल पोषण - येईल नॅचरल चमक...
अक्रोड-बदाम फक्त खाऊ नका, काळ्याभोर आयब्रोजसाठी करा ‘हा’ नॅचरल उपाय, पाहा कसा बदलतो लूक...
१. तेलकट त्वचा (Oily skin) :- 'T' झोन आणि 'U' झोन वरती टिश्यू पेपर ठेवल्यानंतर जर त्याला ऑईल लागून जर तो त्वचेवर चिकटून राहिला तर समजा तुमची त्वचा तेलकट आहे.
२. संमिश्र त्वचा (Combination Skin) :- जर फक्त 'T' झोन ऑयली असेल आणि 'U' झोन ड्राय असेल म्हणजेच टिश्यू पेपरवर काहीच चिकटलेले नसेल किंवा ऑइल नसेल तर तुमची त्वचा कॉम्बिनेशन प्रकारातील आहे म्हणजेच संमिश्र त्वचा आहे.
केसांच्या अनेक समस्या सतावतात ? करुन पाहा आवळा - रिठा - शिकेकाईच्या पाण्याचा असरदार उपाय...
३. कोरडी त्वचा (Dry Skin) :- जर टिश्यू पेपर लावलेल्या भागांतील त्वचा ड्राय असेल म्हणजेच तुमची स्किन जर तुम्हाला ताणल्यासारखी किंवा ओढल्यासारखी घट्ट वाटत असेल आणि टिश्यू पेपरवर काहीच डाग नसतील तो कोरडा असेल तर तुमची त्वचा ड्राय आहे.
४. सामान्य त्वचा (Normal skin) :- चेहऱ्यावर लावलेला टिश्यू पेपरवर जर काहीच नसेल, म्हणजेच कोणत्याही प्रकारचे तेलाचे डाग दिसून आले नाहीत, तर तुमची त्वचा नॉर्मल म्हणजेच सामान्य प्रकारात मोडणारी आहे. मुळातच त्वचेचा पोत चांगला असल्याने या प्रकारच्या त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज नसते.
५. संवेदनशील त्वचा किंवा (Sensitive Skin) :- जर तुमची त्वचा गालाजवळ हलकेच लालसर दिसत असेल, तर तुमची त्वचा Sensitive म्हणजेच संवेदनशील आहे असे समजावे. अशा त्वचेची काळजी घेणे खुपच अवघड असते. कारण संवेदनशील त्वचा ही खूपच नाजूक असते. अशा त्वचेसाठी टिश्यू पेपर टेस्टचीही गरज नसते. चेहऱ्याला लावण्याचे कोणतेही प्रोडक्ट जर बदलले तर लगेचच रॅश येणे, त्वचा लालसर होणे, खाज येणे असा प्रकार सुरू झाला तर आपली त्वचा संवेदनशील आहे हे ओळखावे. वातावरणातील बदल किंवा थोडा वेळ जरी उन्हात, थंडीत गेल्यास या त्वचेवर लगेचच परिणाम दिसून येतो.