Lokmat Sakhi >Beauty > केस मुळापासून काळे करणारे ३ घरगुती उपाय- केस होतील दाट-दिसतील सिल्की आणि चमकदार

केस मुळापासून काळे करणारे ३ घरगुती उपाय- केस होतील दाट-दिसतील सिल्की आणि चमकदार

How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies : कमी वयातच पांढरे होणारे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 05:20 PM2024-06-25T17:20:42+5:302024-06-25T17:24:50+5:30

How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies : कमी वयातच पांढरे होणारे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies | केस मुळापासून काळे करणारे ३ घरगुती उपाय- केस होतील दाट-दिसतील सिल्की आणि चमकदार

केस मुळापासून काळे करणारे ३ घरगुती उपाय- केस होतील दाट-दिसतील सिल्की आणि चमकदार

सध्याच्या काळात केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे (Hair care Tips). आता ही समस्या केवळ वृद्धांपुरती मर्यादित नसून तरुणांमध्येही दिसून येत आहे. एवढेच नाही तर लहान मुलांचेही केस अकाली पांढरे होऊ लागले आहेत (Homemade Colour). केस पांढरे झाल्यावर आपण हेअर डाय किंवा विविध कलरचा वापर करतो. पण बहुतांश हेअर डाय आणि कलरमध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो (Hair Whitening). ज्यामुळे केसांच्या निगडीत अधिक समस्या निर्माण होतात.

बाजारात अनेक उत्पादने मिळतात (Nautural remedies). जे पांढरे केस काळे करण्याचा दावा करतात. पण केमिकल रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा, घरगुती गोष्टींचा वापर करून केस काळे करा. यामुळे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होतील. शिवाय त्यातील पौष्टीक तत्व केसांच्या वाढीस मदत करतील(How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies).

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

कडीपत्ता आणि खोबरेल तेल

कडीपत्ता आणि खोबरेल तेलाचा वापर आपण केसांसाठी करू शकता. यासाठी गॅसवर एक भांडं गरम करण्यासाठी ठेवा, त्यात १० ते १५ कडीपत्ता घाला. नंतर केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल ओता. मध्यम आचेवर तेल उकळवत ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर केस आणि स्काल्पला लावून मसाज करा. किमान तासभर राहूद्या. नंतर शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्याने पांढरे केस काळे होतील.

केस खूपच पातळ - कायम गळतात? ब्यूटी एक्सपर्ट सांगतात ३ हेअर मास्क; केसांची वेणी दिसेल दाट

कांद्याचा रस

कांद्याचा रस देखील केसांसाठी फायदेशीर ठरू शकेल. यासाठी कांदा किसून त्याचा रस काढा. हा रस स्काल्पवर लावा. ३० मिनिटांसाठी तसेच राहू द्या. यानंतर शाम्पूने केस धुवा. कांद्याचा रस केसांचा रंग टिकवून ठेवण्यास मदत करेल. शिवाय त्यातील पौष्टीक घटकांमुळे केस दाट होतील.

पावसाळ्यात चेहऱ्यावर दह्यात १ सोनेरी गोष्टी मिसळून जरूर लावा; मुरुमांचे डाग - टॅनिंग होईल गायब

चहा पाणी आणि मेहेंदी

चहापत्ती आणि मेहेंदीचा वापर करून आपण केसांना नैसर्गिकरित्या कलर करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात चहापत्ती आणि ४ ते ५ मेहेंदीची पानं घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर  गॅस बंद करा. हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. नंतर पाणी केसांना लावा. आपण त्यात मेहेंदी पावडर देखील मिक्स करू शकता. किमान एक तास राहूद्या. नंतर केस शाम्पूने धुवा. हे मिश्रण केसांना नैसर्गिक रंग देण्यास मदत करेल.

Web Title: How To Get Black Hair Naturally - 3 Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.