Join us  

केस फारच लवकर पिकले? डायची गरजच नाही; हे जादूई तेल लावून झटपट मिळवा काळे केस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:06 PM

How to Get Black Hair Naturally :

आजकाल कमी वयाच्या लोकांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या दिसून येते. एकदा केस पिकायला सुरूवात झाली की काही केल्या परत काळे केस उगवणं कठीण असतं. (Natural Home Remedies For Grey Hair) खाण्यापिण्यात पोषक घटकांचा अभाव, हिटींग टुल्सचा वापर यांमुळे केस पांढरे होतात. केमिकल्सच्या संपर्कात आल्यानं कोंडा, केस गळण्यासारख्या केसांच्या इतर समस्याही उद्भवतात. (How to Get Black Hair Naturally)

केस पांढरे करण्यासाठी काहीजण डाय करतात तर काहीजण ग्लोबल कलरचा वापर करतात. केसांना काळेभोर करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी हवातसा परिणाम दिसून येत नाही. घरगुती उपाय तुम्हाला हवेतसे केस मिळवून देण्यात मदत करेल आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्सही जाणवणार नाहीत. 

केस काळे करण्याचा घरगुती उपाय

एका कढईत तेल गरम करा. यासाठी तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता. त्यात कलौंजी म्हणजेच काळ्या बिया, कढीपत्ता घाला. तेल गरम झाल्यानंतर थंड करा. थंड झालेलं तेल बाटलीत भरून ठेवा. आठवड्यातून २ वेळा हे तेल केसांना लावल्यास केसांचा पोत सुधारण्यास मदत होईल आणि केस काळेभोर दिसतील.

काळ्या बियांचे केसांना फायदे

१) कलोंजीमध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. कलोंजीमध्ये 15 अमीनो अॅसिड असतात, जे केसांना निरोगी बनवतात. कलोंजी केसांसाठी उत्कृष्ट कंडिशनर म्हणून काम करते.

२) कलोंजी केसांवर वापरल्याने केस तुटण्याची आणि केस गळण्याची समस्या कमी होते. त्यामुळे केस खूप मऊ होतात. 

३) कलोंजीपासून बनवलेला हेअर पॅक लावल्याने केस लांब आणि टाळू निरोगी होतात. यामुळे केस रेशमी आणि चमकदार होतात.

टॅग्स :फिटनेस टिप्सब्यूटी टिप्सत्वचेची काळजी