आजकाल चुकीच्या लाईफस्टाईलमुळे केस वेळेआधीच पांढरे होत जातात. एकदा केस पांढरे झाले की ते लपवण्यासाठी किंवा पुन्हा काळे करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. (Grey Hairs Solution) केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे केसांचे नुकसानही होऊ शकते. केमिकल्सच्या इफेक्टमुळे एकदा केस पांढरे झाले की सारखे सारखे पांढरे दिसायला लागतात. (How to Blacken Grey Hairs)
केसांना काळे करण्यासाठी तुम्ही ३ वस्तूंचा वापर करू शकता. यात हळद, मोहोरीचे तेल, व्हिटामीन ई कॅप्सूलचा समावेश आहे. या तीन वस्तूंच्या मदतीने तुम्ही केसांना काळेभोर बनवू शकता. रिसर्च गेटवर पब्लिश झालेल्या एका रिपोर्टनुसार हळदीच्या रायझोम्समुळे केसांवर पिवळा रंग येतो त्याचा वापर हेअर डाय म्हणून करता येऊ शकतो. (Ref) हळदीच्या रायझोम्ससह ५ नमुन्यांवर हे परिक्षण करण्यात आले होते.
ही पेस्ट तयार करण्यासाठी सगळ्यात आधी लोखंडाच्या तव्यावर मोहरीचे तेल घालून गरम करून घ्या. त्यात हळद मिसळून घ्या, हळद व्यवस्थित गरम झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. या तेलात व्हिटामीन ई कॅप्सूल घालून व्यवस्थित मिसळून घ्या. आठडवड्यातून २ ते ३ वेळा हे तेल आपल्या केसांना लावा. ज्यामुळे पांढरे केस काळे होतील आणि तुम्हाला महागड्या शॅम्पूचा वापरही करावा लागणार नाही आणि केस कलर करण्याची झंझटही नसेल.
केस पांढरे का होतात?
आजकाल लाईफस्टाईल अशी झाली आहे की प्रत्येकालाच टेंशन असतं. याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. टेंशन किंवा स्ट्रेसफुल लाईफमुळे केस पांढरे होऊ लागतात किंवा केस गळू लागतात. तुम्ही जे काही खाता त्याचा परिणाम केसांवरही होत असतो. जर तुम्ही हेल्दी पदार्थांचे सेवन केले नाही तर याचा परिणाम केसांवरही दिसून येतो.
केसांना योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळत नाहीत आणि केस गळण्याची समस्या उद्भवते आणि वेळेआधीच केस पांढरे होऊ लागतात. स्ट्रेटनिंग, हायलाईट अशा प्रकारच्या हिटींग ट्रिटमेंट्समुळे केस वेळेआधीच गळू लागतात आणि हानीकारक क्रिम्सच्या संपर्कात आल्यामुळे केस पांढरेसुद्धा होऊ लागतात.