आपले केस नेहमी काळेभोर, सुंदर दिसावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे केस पांढरे होणे सामान्य झाले आहे. वाढत्या वयामुळेच नाही तर अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही केस पांढरे होतात. (Hair Care Tips) प्रत्येक तिसरा व्यक्ती अशा प्रकारच्या समस्येशी झुंजत आहे, पण तुमच्या स्वयंपाकघरात अशीच एक गोष्ट आहे, ज्याचा वापर करून तुमचे केस देखील काळे होतील आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. (Grey hair solution without dying)
पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही चहाच्या पानांचाही वापर करू शकता. पांढरे केस काळे करण्यासाठी गरम पाण्यात चहाची पाने उकळा. यामध्ये तुम्ही सुमारे 7 टी बॅग किंवा 5-6 चमचे चहाची पाने घेऊ शकता.
चहाची पाने किमान एक कप पाण्यात उकळा. हे पाणी थंड झाल्यावर डोक्याला लावा. 35-40 मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने केस चांगले धुवा. तुम्हाला दिसेल की यामुळे तुमच्या केसांना रंग येईल. (Permanent solution for grey hair naturally)
चांगल्या परिणामांसाठी या टिप्स वापरा
चहाच्या पानांचा प्रभाव थोडा अधिक वाढवण्यासाठी तुम्ही चहाच्या पानांमध्ये कॉफी देखील वापरू शकता. कारण यामुळे तुमच्या केसांवर आणखीनच रंग येईल.यासाठी 3 चमचे कॉफीमध्ये 2 चमचे चहाच्या पानांमध्ये मिसळा आणि एक कप पाण्यात सुमारे 15 मिनिटे उकळा. यामुळे पांढरे केस नक्कीच काळे होतील. लक्षात ठेवा की चहाची पाने लावल्यानंतर लगेच केसांवर शॅम्पू वापरू नका, कारण यामुळे केसांना योग्य रंग येणार नाही आणि आलेला रंग देखील निघून जाईल. 2 दिवसांनी शॅम्पू करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या केसांचा रंग जास्त काळ टिकेल.
चेहरा काळवंडलाय, पिंपल्सचे काळे डागही खूप झालेत? ५ हेल्दी ड्रिंक्स, आठवडाभरात मिळेल ग्लोईंग स्किन
इतर उपाय
१) मेथी खोबरेल आणि एरंडेल तेलात मिसळून शिजवा. त्यानंतर तेल थंड झाल्यावर डोक्याला मसाज करा. असे एक आठवडा सतत करत राहा, केस पांढरे होण्यापासून लवकरच सुटका होईल.
२) पांढरे केस काळे करण्यासाठी कांदा खूप गुणकारी आहे. कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावा, नंतर कोरडे झाल्यावर केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा कांद्याचा रस वापरा. यामुळे केसांची वाढही चांगली होईल.
३) कोरफडीमुळे त्वचा तर चमकदार तर होतेच पण त्याचबरोबर केसांनाही चमक मिळते. जेव्हाही तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा कोरफडीच्या जेलने स्कॅल्पला थोडा वेळ मसाज करा. ते सुकल्यावर शॅम्पूने धुवा आणि कंडिशनर लावू नका.