Lokmat Sakhi >Beauty > मेहंदी लावून लालसर झालेले केस आवडत नाही? मेहंदीमध्ये ४ गोष्टी टाका, केस होतील काळेभोर- सिल्की

मेहंदी लावून लालसर झालेले केस आवडत नाही? मेहंदीमध्ये ४ गोष्टी टाका, केस होतील काळेभोर- सिल्की

How to Get Black Hair Using Mehandi: मेहंदी लावल्याने केसांना येणारा लालसर रंग अनेकांना आवडत नाही. म्हणूनच केसांना काळसर रंग यावा, यासाठी मेहंदी भिजवताना हे काही पदार्थ वापरून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2023 02:38 PM2023-01-02T14:38:44+5:302023-01-02T14:39:51+5:30

How to Get Black Hair Using Mehandi: मेहंदी लावल्याने केसांना येणारा लालसर रंग अनेकांना आवडत नाही. म्हणूनच केसांना काळसर रंग यावा, यासाठी मेहंदी भिजवताना हे काही पदार्थ वापरून बघा..

How to get black hair using mehendi or heena? Don't like red- brown hair using mehendi? try these 4 ingredients for black hair | मेहंदी लावून लालसर झालेले केस आवडत नाही? मेहंदीमध्ये ४ गोष्टी टाका, केस होतील काळेभोर- सिल्की

मेहंदी लावून लालसर झालेले केस आवडत नाही? मेहंदीमध्ये ४ गोष्टी टाका, केस होतील काळेभोर- सिल्की

Highlightsमेहंदी भिजविण्यासाठी ही एक खास पद्धत वापरून बघावी. केसांना लालसर रंग येण्याऐवजी काळा रंग येतो.

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे. म्हणून मग पांढरे केस लपविण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करावा लागतो. अजूनही कमी वयात केसांना डाय करण्याची, वेगवेगळे हेअर कलर लावण्याची अनेकांना भीती वाटते. म्हणून मग अशावेळी मेहंदी लावणे हा बऱ्याच जणांना केस रंगविण्यासाठी एक सुरक्षित पर्याय वाटते. पण मेहंदी लावल्यानंतर केसांना येणारा लालसर रंग मात्र काही जणांना आवडत नाही (How to get black hair using mehandi?). अशा लोकांनी मेहंदी भिजविण्यासाठी ही एक खास पद्धत वापरून बघावी. (4 ingredients must add in mehendi for black hair)

मेहंदी लावल्यानंतर केसांना काळसर रंग येण्यासाठी
१. हा उपाय इन्स्टाग्रामच्या theglobalistagirl या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

सतत डोकं दुखतं- सारखं ठणकतं? करून बघा ३ उपाय, पेनकिलर घेण्यापेक्षा कधीही उत्तम पर्याय

२. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर १ ग्लास पाणी गरम करायला ठेवावं.

३. या पाण्यात २ टेबलस्पून चहा पावडर, कढीपत्त्याची १५ ते २० पाने, १ टीस्पून कॉफी पावडर टाकावी.

४. हे मिश्रण मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे उकळू द्यावं.

 

५. त्यानंतर एका लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी पावडर आणि जास्वंदाच्या फुलाची पावडर सारख्याच प्रमाणात टाकावी. जास्वंदाच्या फुलाची पावडर आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळेल.

कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट

मेहंदी आणि जास्वंद पावडरमध्ये आपण आधी उकळून घेतलेले पाणी टाकावे आणि सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून त्याची पेस्ट तयार करावी. ही मेहंदी लोखंडाच्या कढईमध्ये रात्रभर राहू द्यावी.

६. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मेहंदी केसांना लावावी. १ ते दिड तास तशीच ठेवून नंतर केस धुवून टाकावेत. हा उपाय केल्यामुळे केसांना लालसर रंग येण्याऐवजी काळा रंग येतो, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

 

Web Title: How to get black hair using mehendi or heena? Don't like red- brown hair using mehendi? try these 4 ingredients for black hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.