Lokmat Sakhi >Beauty > केस पांढरे झालेत- डाय लावायची भिती? अर्धे बीट 'या' पद्धतीनं केसांना लावा; केसांना सुंदर रंग येईल

केस पांढरे झालेत- डाय लावायची भिती? अर्धे बीट 'या' पद्धतीनं केसांना लावा; केसांना सुंदर रंग येईल

How To Get Black Hairs Naturally : केमिकल्सयुक्त हेअर कलरमुळे केस वेळेआधीच कमकुवत होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 06:29 PM2024-10-06T18:29:18+5:302024-10-06T19:06:46+5:30

How To Get Black Hairs Naturally : केमिकल्सयुक्त हेअर कलरमुळे केस वेळेआधीच कमकुवत होतात.

How To Get Black Hairs Naturally : Beetroot Juice For White Hairs Homemade Hair Dye For White Hairs | केस पांढरे झालेत- डाय लावायची भिती? अर्धे बीट 'या' पद्धतीनं केसांना लावा; केसांना सुंदर रंग येईल

केस पांढरे झालेत- डाय लावायची भिती? अर्धे बीट 'या' पद्धतीनं केसांना लावा; केसांना सुंदर रंग येईल

वय वाढत जातं तसं केस पांढरे होणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. चुकीची लाईफस्टाईल, पोषणाची कमतरता आणि वाढतं प्रदूषण यांमुळे कमी वयातच केस पांढरे होऊ लागतात. (White Hairs Solution) अशा स्थितीत पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाय आणि हेअर कलर्सचा वापर करतात. (Beetroot Juice For White Hairs Homemade Hair Dye For White Hairs)

हे सर्व कलर्स अमोनियायुक्त असल्यामुळे केस कमजोर होतात. या हेअर कलरमुळे केस वेळेआधीच कमकुवत होतात. बाजारातील केमिकल्सयुक्त हेअर कलर्सचा वापर करण्यापेक्षा घरच्याघरी  हेअर कलर बनवल्यास केस काळेभोर आणि दाट होण्यास मदत होईल. (How To Get Long Thick Hairs Naturally)

केसांसाठी बीटाचा हेअर डाय कसा बनवायचा?

बीटाचा रस केसांसाठी उत्तम मानला जातो.  जर तुम्हाला नॅच्युरली केसांना काळं बनवायचं असेल तर तुम्ही बिटाच्या रसात काही खास पदार्थ मिसळून घरीच नॅच्युरल हेअर डाय बनवू शकता. बीट केसांसाठी बरेच फायदेशीर ठरते. यात बरेच एंटी ऑक्सिडेंट्स असतात. याशिवाय बीटात व्हिटामीन ई, व्हिटामीन सी असते. 

जे केसांसाठी फायदेशीर ठरते यात क्रिएटीनिनसुद्धा असते ज्यामुळे केस निरोगी, दाट राहतात आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया संथ होते. बिटातील व्हिटामीन सी केसांमध्ये कोलोजनचे उत्पादन वाढवते.  यातील सिलिका केसांसाठी कॅल्शियमचे निर्माण करते ज्यामुळे केस हेल्दी आणि निरोगी राहतात.

बीटाचा हेअर डाय बनवण्यासाठी सगळ्यात आधी बीटाचा रस काढून घ्या. यात एक चमचा आवळा पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, आणि १ चमचा आल्याचा रस मिसळा. हे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून आपल्या केसांना लावा. नंतर जवळपास २ मिनिटं  केसांना लावलेलं राहू द्या. २ तासांनी साध्या पाण्यानं केस धुवा. या हेअर डायमुळे केसांना चांगला रंग येईल आणि केस दाट सुंदर दिसतील.

Web Title: How To Get Black Hairs Naturally : Beetroot Juice For White Hairs Homemade Hair Dye For White Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.