Join us  

पांढरे केस वाढले, डायची भीती वाटते? घरी बनवलेला हा शॅम्पू वापरा, काळेभोर होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 8:31 PM

How to get Black Hairs Naturally : केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाहीत. (Hair Care Tips)

केस पांढरे झाल्यानंतर आत्मविश्वास कमी होऊ लागतो. आपण कमी वयातच म्हातारे झालोय का असं वाटू लागतं.  आजकाल वृद्धांनाच नाही तर कमी वयाच्या लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. केस काळे करण्यासाठी डाय करण्याची अनेकांना भिती वाटते. (How to get Black Hairs Naturally) केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाहीत. (Hair Care Tips)

सगळ्यात आधी २ कप गरम पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात एक चमचा ब्लॅक सीड्स घाला. हे पाणी उकळल्यानंतर  गाळून घ्या. या पाण्यात एक चमचा कोकोनट मिल्क शॅम्पू घाला हे मिश्रण एकत्र करून घ्या. त्यानंतर या सोल्यूशननं केस व्यवस्थित धुवा. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल, केसांचं गळणं कमी होईल आणि केसांचा पोत सुधारण्यासही मदत होईल. 

डेली वेअरसाठी लहान मंगळसुत्रांच्या १० आकर्षक डिजाइन्स; पाहा बजेटमध्ये बसणारा नाजूक-सुंदर दागिना

याशिवाय लिंबाच्या रसात  काळ्या बिया (कलौंजी) मिसळून लावा. यामुळे केस पिकण्याची समस्या काही महिन्यांत दूर होईल. ते लावण्यासाठी एका लिंबाचा रस 2 चमचे कलोंजी तेलात मिसळा. या तेलाने टाळूला नीट मसाज करा. जर टाळू तेलकट असेल तर केस आणि मुळांना या तेलाने पोषण मिळते. मसाज केल्यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स