आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी अनेकजण आपले पांढरे केस काळे करण्याचं काम करतात. जर काहीजण थोडे जरी पांढरे केस दिसत असतील तर लगेच केमिकल्सयुक्त डाय केसांना लावतात. अशा स्थितीत तुम्हाला केस मुळापासून काळे करायचे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. कलौंजीचा हा उपाय केल्याने तुमचा एक-एक पांढरा केस काळा होण्यास मदत होईल आणि केस मजबूत सुद्धा होतील. हा घरगुती उपाय कसा करायचा समजून घेऊ. (How To Get Black Hairs Naturally)
केसांसाठी कलौंजी फायदेशीर
कलौंजीला ब्लॅक सिड्स असंही म्हटलं जातं. अनेक वर्षांपासून आयुर्वेदात वेगवेगळ्या आरोग्यासंबंधित समस्यांसाठी कलौंजीचा वापर केला जात आहे. यात एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे कोंडा कमी होतो, हेअर फॉलची समस्या रोखता येते, केस पांढरे होणं थांबवता येते. केसांना काळे करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये कलौंजीचा समावेश होतो.
केसांना काळे करण्यासाठी कोणते साहित्य लागेल
१) कलौंजी - १ वाटी
२) चहा पावडर - २ चमचे
३) बीटाची पावडर - १ चमचा
४) मोहोरीचं तेल - २ चमचे
सगळ्यात आधी एक लोखंडाची कढई घ्या त्यात कलौंजी आणि चहा पावडर भाजून घ्या. नंतर या कढईत एकचा बीटाची पावडर घाला नंतर या बिया भाजून घ्या. या बिया काळ्या झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या.
रोज वापरण्यासाठी सोन्याच्या मंगळसुत्राचे ८ नाजूक पॅटर्न्स; पाहा सेलिब्रिटींचे मंगळसुत्र डिजाईन्स
एका एका वाटी घेऊन त्यात १ चमचा कलौंजी पावडर, २ चमचे मोहोरीचं तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर पांढऱ्या केसांना ३० ते ४० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. हा उपाय केल्यास प्रत्येक केस मुळापासून काळा होण्यास मदत होईल.
केसांसाठी चहा पावडरचं पाणी फायदेशीर ठरते. चहा पावडरचं पाणी मेहेंदीत मिसळून लावा. हे पाणी केसांना काळे बनवण्यास मदत करेल ज्यामुळे केसांना पोषण मिळेल. ज्यामुळे केस तुटणं आणि केस गळणं टाळता येतं आणि केसांची चमकही टिकून राहते. तुम्ही केस धुण्यासाठी चहा पावडरचं पाणी वापरू शकता.