Lokmat Sakhi >Beauty > How to get black Hairs Naturally : फक्त २ रूपयांच्या तुरटीनं पांढरे केस होतील काळेभोर; रोज सकाळी असा करा वापर

How to get black Hairs Naturally : फक्त २ रूपयांच्या तुरटीनं पांढरे केस होतील काळेभोर; रोज सकाळी असा करा वापर

How to get black Hairs Naturally : लाल आणि पांढरी अशा दोन प्रकारची असली तरी पांढरी तुरटी जास्त वापरली जाते. पांढरे केस काळे करण्यासाठीही तुरटीचा वापर केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:41 AM2022-03-21T11:41:24+5:302022-03-21T11:56:41+5:30

How to get black Hairs Naturally : लाल आणि पांढरी अशा दोन प्रकारची असली तरी पांढरी तुरटी जास्त वापरली जाते. पांढरे केस काळे करण्यासाठीही तुरटीचा वापर केला जातो.

How to get black Hairs Naturally : Home remedy beauty benefits of alum fitkari for white hair and skin problems | How to get black Hairs Naturally : फक्त २ रूपयांच्या तुरटीनं पांढरे केस होतील काळेभोर; रोज सकाळी असा करा वापर

How to get black Hairs Naturally : फक्त २ रूपयांच्या तुरटीनं पांढरे केस होतील काळेभोर; रोज सकाळी असा करा वापर

तुरटी (Alum) आपल्या सर्वांच्या घरात सहज मिळते. त्याचे रासायनिक नाव पोटॅश असे आहे. याचा वापर घरांमध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी किंवा दाढी केल्यानंतर रक्तस्त्राव थांबवण्यासाठी केला जातो. तथापि, त्याचे इतर अनेक फायदे देखील आहेत. तुरटीमुळे अनेक आजारांवर आराम मिळतो. (Hair Care Tips) ती लाल आणि पांढरी अशा दोन प्रकारची असली तरी पांढरी तुरटी जास्त वापरली जाते. पांढरे केस काळे करण्यासाठीही तुरटीचा वापर केला जातो.  (Home remedy beauty benefits of alum fitkari for white hair and skin problems) जर तुम्ही याचा दीर्घकाळ वापर केला तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. (How to get black Hairs Naturally)

काळ्या केसांसाठी तुरटीचा असा करा वापर

तुरटीचा एक छोटा तुकडा घेऊन बारीक करून त्यात १ चमचा गुलाब पाणी टाका. नंतर केसांना लावा आणि कमीतकमी 5 मिनिटे मसाज करा. 1 तासानंतर केस शॅम्पूने धुवा. पांढर्‍या केसांचा त्रास असलेले लोक आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुरटी लावू शकतात. असे केल्याने पांढर्‍या केसांची समस्या हळूहळू कमी होईल.  (Beauty benefits of alum fitkari)

केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा

केस धुतल्यानंतर कोमट पाण्यात तुरटी आणि कंडिशनर एकत्र मिसळा. केसांच्या तळापर्यंत लावा आणि नंतर 15 ते 20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. हे आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा करा.

फक्त ६ गोष्टी वाढवतील तुमचं आयुष्य; तज्ज्ञांनी सांगितलं निरोगी दीर्घायुष्याचं सोपं सिक्रेट

पिंपल्सवर गुणकारी

तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांचे खूप डाग असतील आणि तुम्हाला ते काढायचे असतील तर तुरटी बारीक करून पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट मुरुमांच्या डागांवर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने काही दिवसात डाग निघून जातात.

सुरकुत्यांवर फायदेशीर

तुमच्या त्वचेवर हळू हळू सुरकुत्या येत असतील तर तुरटीचा वापर करून घट्ट करा. त्याचा वापर करण्यासाठी तुरटी गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमचा चेहरा घट्ट होईल. तसंच अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्यानं त्वचा चांगली राहते आणि घामाचा दुर्गंधही येत नाही. 

 

Web Title: How to get black Hairs Naturally : Home remedy beauty benefits of alum fitkari for white hair and skin problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.