वेळेआधीच केस पांढरं होणं हा सध्याचा खूपच कॉमन प्रोब्लेम आहे. (Grey Hairs Solution) वाढत्या वयात केस पांढरे होणं हे खूपच कॉमन झाले आहे. ज्यामुळे कॉन्फिडेंन्स लेव्हलही कमी होते. अशात केस काळे करण्यासाठी लोक हेअर मास्क किंवा हेअर कलरचा आधार घेतात. (Hair Care Tips) त्यातील केमिकल्स केसांना डॅमेज करतात याशिवाय केसांच्या आरोग्याचे नुकसान होते केसांची वाढही होत नाही. केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता. केसांना नॅच्युरली काळे बनवण्यासाठी तुम्ही हा हेअर पॅक बनवू शकता. हा हेअर पॅक तुम्हाला केसांच्या वाढीसाठी मदत करेल. (How To Get Long Hairs Naturally)
केस काळे करण्यासाठी जास्वंदाच्या फुलांचा हेअर पॅक (Hair Pack For Hair Growth)
केस काळे करण्यासाठी लोक हेअर कलर किंवा डायचा आधार घेतात. यातील केमिकल्स केसांना डॅमेज करतात. याशिवाय केसांना काळे ठेवतात. केसांना काळे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. केसांना नॅच्युरली काळे करण्यासाठी हेअर पॅक बनवणं खूपच सोपं आहे. या हेअर पॅकच्या मदतीनं केसांवर केमिकल डाय न वापरता नैसर्गिकरित्या केस काळे होतील.
केसांसाठी नैसर्गिक हेअर पॅक कसा बनवायचा
1) जास्वंदाची फुलं- 4 ते 5
2) दही- २ चमचे
3) कॉफी पावडर- २ मोठे चमचे
4) व्हिटामीन ई कॅप्सूल- २ मोठे चमचे
5) एलोवेरा जेल- १ मोठा चमचा
हेअर पॅक बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
हा हेअर पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी जास्वंदाची फुलं हातांनी क्रश करून घ्या. त्यात दही, कॉफी पावडर, व्हिटामीन ई कॅप्सूल, एलोवेरा जेल घालून सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर हा पॅक केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्या. एक टॉवेल गरम पाण्यात बुडवून पिळून घ्या. हा टॉवेल जवळपास ३० मिनिटं केसांना लावून ठेवा.
३० मिनिटांनी हा टॉवेल काढून पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही केस धुण्यासाठी माईल्ड शॅम्पूचाही वापर करू शकता. यामुळे केस नॅच्युरली काळे होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा या हेअर पॅकचा वापर करा.