Lokmat Sakhi >Beauty > माथ्यावरचे केस जास्तच पांढरे दिसतात? किचनमधल्या ३ वस्तू केसांना लावा; डाय न लावता काळे होतील केस

माथ्यावरचे केस जास्तच पांढरे दिसतात? किचनमधल्या ३ वस्तू केसांना लावा; डाय न लावता काळे होतील केस

How To Get Black Hairs Naturally (kes Kale Karnyache Upay) : पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही हेअर मास्क  लावू शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 10:34 AM2024-08-13T10:34:58+5:302024-08-13T10:38:18+5:30

How To Get Black Hairs Naturally (kes Kale Karnyache Upay) : पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही हेअर मास्क  लावू शकता.

How To Get Black Hairs Naturally : Types Of Hair Mask For Grey Hairs Homemade Hair Mask For Hairs | माथ्यावरचे केस जास्तच पांढरे दिसतात? किचनमधल्या ३ वस्तू केसांना लावा; डाय न लावता काळे होतील केस

माथ्यावरचे केस जास्तच पांढरे दिसतात? किचनमधल्या ३ वस्तू केसांना लावा; डाय न लावता काळे होतील केस

दिवसेंदिवस केस पांढरे होण्याची समस्या वाढत आहे. (Hair Care Tips) पोषक तत्वांची कमतरता, खराब लाईफस्टाईल, ताण-तणाव, प्रदूषण आणि जास्त केमिक्लसयुक्त उत्पादनांचा वापर केल्यामुळे केस वेळेआधीच खराब होत आहे. पांढऱ्या केसांमध्ये वय जास्त दिसून येतं अनेकदा आत्मविश्वासही कमी होतो. महागडे हेअर कलर लावल्यानं स्काल्पशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. (Types Of Hair Mask For Grey Hairs)

पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही हेअर मास्क  लावू शकता. हा हेअर मास्क केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यास मदत करेल. हा हेअर मास्क केसांना लावल्यानं कोणतंही नुकसान होणार नाही केस दाट आणि शायनी होतील. पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर मास्क कसा तयार करावा. (How To Grow Hairs Naturally In Marathi)

१) भृंगराज आणि  नारळाच्या तेलाचा हेअर मास्क (Bhringraj And Coconut Oil)

नॅशनलल लायब्रेरी ऑफच्या मेडिसिनच्या रिपोर्टनुसार संशोधनांतून हे सिद्ध झाले आहे की Eclipta alba  एक्लिपता अल्बा म्हणजेच भृंगराज केसांच्या वाढीसाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. एका भांड्यात तेल गरम करून त्यात भृंगराज पावडर घाला. एक मिश्रण एकजीव करून थंड करून घ्या नंतर गाळून एका बॉटलमध्ये भरा. (Ref) हे मिश्रण  केस आणि स्काल्पवर लावा. सकाळी उठल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. भृंगराज केसांना  नैसर्गिक रंग देतो आणि नारळाचे तेल केसांतील प्रोटीन वाढवते. ज्यामुळे केस पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

सच्चे मित्र कोणते आणि कामापुरता मामा कोण कसं ओळखाल? विकास दिव्यकिर्ती सांगतात सोपा फॉर्म्युला

२) आवळा आणि मेथीचा हेअर मास्क (Amla And Methi Hair Mask)

हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका कढईत ऑलिव्ह ऑईल व्यवस्थित गरम करून घ्या त्यात या दोन्ही पावडर घालून मिक्स करा. मिश्रण थंड झाल्यानंतर एक ग्लास बॉटलमध्ये भरा. हे मिश्रण पूर्ण रात्रभर केसांना लावलेलं राहू द्या. सकाळी शॅम्पूने हेअर वॉश करा. आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते. जे केसांमध्ये मेलेनिनचे उत्पादन वाढवते. मेथीच्या बियांमध्ये अमिनो एसिड्स असतात ज्यामुळे पांढरे केस रोखण्यास मदत होते. 

कंबर दुखते-हाडं कमजोर झाली? रोज १ ग्लास दुधात मखाने घालून खा; बळकट होतील हाडं

३) हिना आणि कॉफी हेअर मास्क (Heena And Coffee Hair Mask)

हिना आणि कॉफी हेअर मास्क तयार करण्यासाठी १ ते २ चमचे कॉफी १ कप पाण्यात मिसळून व्यवस्थित उकळवून घ्या हे पाणी थंड झाल्यानंतर त्यात हिना पावडर आणि दही घालून फेटून एक जाड मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांना २ ते ३ तासांसाठी लावा. त्यानंतर  केस माईल्ड शॅम्पूने धुवा.

Web Title: How To Get Black Hairs Naturally : Types Of Hair Mask For Grey Hairs Homemade Hair Mask For Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.