Join us  

सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावर दिसणारा सोनेरी ग्लो तुमच्या चेहऱ्यावरही येईल फक्त १० रुपयांत- बघा उपाय... .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 2:48 PM

How To Get Bridal Glow Like Celebrities?: सेलिब्रिटी हजारो, लाखो रुपये खर्च करून चेहऱ्यावर जी सुंदर चमक मिळवतात, ती घरच्याघरी फक्त १० ते १५ रुपयांचं साहित्य वापरून कशी मिळवायची ते पाहा...(best home remedies using rice water for the radiant glowing skin)

ठळक मुद्देत्वचेवरची चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि दिवसेंदिवस वाढविण्यासाठी हा उपाय आठवड्यातून एकदा करा. 

सेलिब्रिटी लोकांना त्यांच्या सौंदर्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण त्यांच्या कामाचं स्वरुप म्हणून त्यांना सुंदर, तरुण दिसणं गरजेचंच असतं. त्यासाठी ते लोक नेहमीच महागड्या ट्रिटमेंट्स घेतात. पण आपलं तसं नसतं. आपण आपल्या सौंदर्यासाठी एवढे पैसे खर्च करू शकत नाही. पण तरीही त्यांच्यासारखीच सुंदर, तरुण, चमकदार त्वचा मात्र नक्की मिळवू शकतो (how to get bridal glow like celebrities?). आपल्याकडच्या सौंदर्यशास्त्रातले काही घरगुती उपाय नियमितपणे केले तर नक्कीच पिंपल्स, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, ॲक्ने असे त्रास कमी होऊन आपली त्वचा छान निरोगी होऊ शकते. तसेच ती सुंदर, चमकदार दिसू शकते. त्यासाठी घरगुती साहित्य वापरून नेमके कोणते उपाय करायचे ते पाहा...(best home remedies using rice water for the radiant glowing skin)

 

पिंपल्स, ॲक्ने कमी करून चेहरा चमकदार करण्यासाठी उपाय

सेलिब्रिटींप्रमाणे चमकदार त्वचा मिळविण्यासाठी नेमका काय उपाय करावा, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ fashionwithfahad या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. २ स्टेप्समध्ये हा उपाय करायचा आहे.

'या' सवयी असणारी मुलं मोठेपणी अतिशय बुद्धिमान होतात- बघा कशी ओळखायची हुशार मुलं

१. क्लिंझिंग

फेस क्लिझिंग करण्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे राईस वॉटर आणि १ चमचा रोज वॉटर घ्या. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावून चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेवरची सगळी घाण, धूळ निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होण्यास मदत होईल.

 

२. स्किन ब्राईटनिंग फेस मास्क

त्वचेवर छानसा सोनेरी ग्लो देणारा फेस मास्क तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये २ टेबलस्पून तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये १ टीस्पून मध टाका. त्यानंतर कच्चे दूध टाकून त्याची पेस्ट तयार करा.

फ्लॉवरपॉटमधली फुलं १- २ दिवसांत सुकतात? 'हा' खास पदार्थ टाका, फुलं राहतील फ्रेश- सुगंधी

आता हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तास तसाच राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून चेहऱ्यावरचा लेप काढून टाका. त्वचा खूपच नितळ, स्वच्छ झालेली जाणवेल. त्वचेवरची चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि दिवसेंदिवस वाढविण्यासाठी हा उपाय आठवड्यातून एकदा करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसेलिब्रिटीहोम रेमेडी