हल्ली कमी वयात अनेक जणांचे केस पांढरे होत आहेत. पांढरे केस लपविण्यासाठी मग काही जण हेअर कलर करतात. पण केमिकल्सच्या रंगाचे प्रयोग केसांवर करायला नको वाटतं म्हणून बहुतांश लोक मेहेंदी लावण्याचा पर्याय निवडतात. तुम्हालाही पांढरे केस रंगविण्यासाठी एखादा नैसर्गिक उपाय पाहिजे असेल तर हा एक उपाय करून पाहा (how to colour hair without using mehendi or dye?). हा उपाय केल्यावर केसांना छान बरगंडी शेड येईल (home remedies for gray hair). हा उपाय करण्यासाठी मेहेंदी किंवा हेअर कलरची काहीही गरज नाही. बघा बीटरुट वापरून केस कशा पद्धतीने छान बरगंडी रंगाचे करायचे...(How to get burgundy hair naturally)
केसांना बरगंडी शेड येण्यासाठी घरगुती उपाय
केसांना चमकदार बरगंडी रंग यावा, म्हणून काय उपाय करायचा याची माहिती Simple Home Remedies या फेसबूक पेजवर शेअर करण्यात आली आहे.
लग्नसराई स्पेशल : आर्टिफिशियल पोल्की ज्वेलरी घ्या, पाहा नजर खिळवून ठेवणारे स्टायलिश- सुंदर दागिने
हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ मध्यम आकाराचं बीटरुट, २ ते ३ कांद्यांची टरफलं आणि १ टेबलस्पून चहा पावडर लागणार आहे.
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी बीटरुटचे बारीक तुकडे करून घ्या आणि मिक्सरमधून ते वाटून त्याची पेस्ट करा.
बीटरुरची पेस्ट, कांद्याची टरफलं आणि चहा पावडर एका पातेल्यात एकत्र करा आणि ५ ते ७ मिनिटे उकळवून घ्या.
आलिया भट नेहमीच करते तिच्या आवडीचं 'हे' खास फेशियल, घरच्याघरी करायला एकदम सोपं
आता हे पाणी गाळून घ्या. या पाण्यामध्ये तुमच्या आवडीचा शाम्पू टाका. आता हे मिश्रण केसांवर लावा आणि १० मिनिटांनी केस धुवून टाका. केसांना छान चमकदार बरगंडी रंग मिळेल, असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
पण शाम्पू केसांवर १० मिनिटांसाठी लावून ठेवणे योग्य नाही, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे त्या मिश्रणात शाम्पू न टाकता ते केसांवर लावा. त्यानंतर १० ते १५ मिनिटे ते तसेच राहू द्या. आणि नंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.