Join us  

भुवया खूपच पातळ झाल्या? ४ सोपे उपाय पाहा, भुवया होतील दाट- रेखीव, चेहरा दिसेल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 12:13 PM

Beauty Tips For Dark Eyebrows: भुवया खूपच पातळ झाल्या असतील किंवा तिथल्या केसांची वाढ खुंटल्यासारखी झाली असेल तर हे काही सोपे उपाय करून पाहा... (home remedies for eyebrow growth)

ठळक मुद्देसाधारण वयाच्या तिशीपर्यंत भुवया छान दाटसर, जाड असतात. पण त्यानंतर भुवयांचे केस पातळ होत आहेत किंवा त्यांची वाढ खुंटली आहे, असं लक्षात येतं.

भुवया हा आपल्या चेहऱ्याचा अतिशय महत्त्वाचा भाग. तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य आणखी खुलविण्याचं काम भुवया करतात. भुवयांना जर आपल्या चेहऱ्यानुसार योग्य आकार मिळाला तर त्या तर रेखीव दिसतातच, पण त्यासोबतच चेहरा, डोळे हे देखील सुंदर दिसू लागतात. साधारण वयाच्या तिशीपर्यंत भुवया छान दाटसर, जाड असतात. पण त्यानंतर भुवयांचे केस पातळ होत आहेत किंवा त्यांची वाढ खुंटली आहे, असं लक्षात येतं. अशा पातळ भुवया अनेकांना आवडत नाहीत. म्हणूनच तुमच्याही भुवयांच्या बाबतीत या तक्रारी सुरू झाल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि भुवयांना दाट, रेखीव, काळेभोर करण्यासाठी हे काही आयुर्वेदिक उपाय करून पाहा. (how to get dark, broad eyebrows with ayurvedic remedies)

 

भुवयांचे केस वाढत नसतील तर उपाय

भुवयांच्या केसांची चांगली वाढ होऊन त्या दाट, काळ्याभोर करण्यासाठी काय उपाय करावे, याविषयीचा एक व्हिडिओ chitchatrajlavi या पेजवर शेअर करण्यात आला आहे. ते उपाय नेमके कोणते पाहा... 

घरातले स्वीचबोर्ड खूप पिवळट- काळपट झाले? फक्त १ पदार्थ घेऊन झटपट करा स्वच्छ- चमकतील नव्यासारखे

१. आपण डोक्याला जसे नियमितपणे तेल लावतो, तसेच तेल लावून भुवयांनाही मालिश करणं गरजेचं आहे. भुवयांसाठी खासकरून बदाम तेल, एरंडेल तेल किंवा खोबरेल तेल वापरावं आणि अगदी रोजच हा उपाय केला तरी चालेल.

 

२. तेलाप्रमाणेच तुम्ही कोरफडीचा गर किंवा ॲलोव्हेरा जेल लावूनही भुवयांना हलक्या हाताने मसाज करू शकता. 

पुदिना विकत कशाला आणायचा? कुंडीत लावून टाका- भराभर वाढेल, नेहमीच ताजा पुदिना मिळेल

३. तिसरा उपाय म्हणजे कडुलिंब, जेष्ठमध किंवा जास्वंदाचा लेप चेहऱ्याला लावा. या वनस्पती जर तुम्हाला मिळाल्या तर त्या काही वेळ पाण्यात भिजत घाला. त्या वाटून त्यांचा लेप करा आणि तो भुवयांवर लावा. १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. 

४. आयब्रोज विंचरण्यासाठी बाजारात छोटे ब्रश मिळतात. तो ब्रश दिवसातून एकदा तरी भुवयांवर फिरवावा. त्यामुळे तेथील त्वचेखाली रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि भुवयांचे केस वाढण्यास मदत होते. 

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सघरगुती उपाय