Lokmat Sakhi >Beauty > तुम्हालाही आवडतात चमकते ओठ? ग्लॉसी लूकसाठी 'अशी' लावा लिपस्टिक

तुम्हालाही आवडतात चमकते ओठ? ग्लॉसी लूकसाठी 'अशी' लावा लिपस्टिक

Beauty tips: लिपस्टिक लावून ग्लॉसी, चकाकणारे एकदम आरशासारखे चमकदार ओठ कसे मिळवायचे, याचा शोध घेत असाल, तर नक्कीच हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 07:30 PM2022-01-22T19:30:02+5:302022-01-22T19:35:02+5:30

Beauty tips: लिपस्टिक लावून ग्लॉसी, चकाकणारे एकदम आरशासारखे चमकदार ओठ कसे मिळवायचे, याचा शोध घेत असाल, तर नक्कीच हे वाचा..

How to get glass lip look, 5 tips that makes your lips glossy and shiny | तुम्हालाही आवडतात चमकते ओठ? ग्लॉसी लूकसाठी 'अशी' लावा लिपस्टिक

तुम्हालाही आवडतात चमकते ओठ? ग्लॉसी लूकसाठी 'अशी' लावा लिपस्टिक

Highlightsओठांना आरशासारखं चकचकीत बनवायचं असेल तर जे लीप ग्लॉस एक्स्ट्रा शायनी असतात, त्यांचा वापर करा.

सध्या चमकणाऱ्या, ग्लॉसी लिप्सचा ट्रेण्ड चालू आहे.. लग्न समारंभात, पार्ट्यांमध्ये तर अशा पद्धतीने लावलेली लिपस्टिक (trendy way of applying lipsticks)  चांगलीच हिट ठरत आहे. आपण अनेक सेलिब्रिटींनाही बघतो.. काही जणींची लिपस्टिक एकदम मॅट असते तर काही जणींची ग्लॉसी... सध्या अशाच ग्लॉसी लिपस्टिकचा ट्रेण्ड सुरू आहे.. अशा पद्धतीची लिपस्टिक लावणाऱ्या मुलींचे ओठ खूपच ॲट्रॅक्टीव्ह, शायनी आणि बोल्ड दिसतात.. आपल्या नेहमीच्याच ग्लॉसी लिपस्टिक वापरून ओठांना असं चमकदार बनवता येतं.. त्यासाठी फक्त या काही गोष्टी करा..

 

१. ओठांचं स्क्रब करा....(scrub your lips)
छान, प्लेन, चकचकीत ओठ पाहिजे असतील तर सगळ्यात आधी ओठांच्या त्वचेची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.. त्यासाठी तर ओठांना व्यवस्थित स्क्रब करा आणि ओठांवरची डेड स्किन काढून टाका. यामुळे तुमचे ओठ एकसमान, मऊ, मुलायम दिसतील. ओठांवरील डेड स्कीन काढण्यासाठी तुम्ही लिक्विड एक्सफोलिएटरचा वापर करू शकता किंवा मग बेसन पीठ, साखर आणि मध अशा पद्धतीच्या घरगुती स्क्रबचा वापर करू शकता. 

 

२. लिपबामने मसाज (gentle massage with lipbam)
ओठांना स्क्रब केल्यानंतर ओठांवर लिपबाम लावा. लिपबाम लावून ओठांना हलक्या हाताने मसाज करा.. यामुळे ओठांचा पोत अधिक सुधारेल. ते स्वच्छ, चमकदार आणि एकसमान दिसू लागतील.

 

३. लिप पेन्सिल वापरा.. (use of lip liner)
ओठांना लिप बाम लावून मसाज केल्यानंतर एक- दोन मिनिटे ओठ तसेच राहू द्या. लिप बामला ओठांवर सेट होऊ द्या. त्यानंतर तुम्ही ज्या रंगाची लिपस्टिक आणि लिपग्लॉस वापरणार आहात, त्याच्याशी मिळतीजुळती लिप लायनर पेन्सिल घ्या आणि ओठांना छानपैकी आऊटलाईन करून टाका. लिप लायनर पेन्सिलचा वापर केल्यामुळे ओठांना एक परफेक्ट शेप मिळतो. 

 

४. ग्लॉसी लिपस्टिक (glossy lipstick)
लिप लायनरने ओठांना आकार दिल्यानंतर ओठांच्या आत लिपस्टिक लावा. ओठांना एकदम चमकदार, ग्लॉसी लूक हवा असेल तर ग्लॉसी लिपस्टिकचाच वापर करायला हवा, हे लक्षात ठेवा.

 

५. शायनी लीप ग्लॉस (shiny lip gloss)
ओठांना आरशासारखं चकचकीत बनवायचं असेल तर जे लीप ग्लॉस एक्स्ट्रा शायनी असतात, त्यांचा वापर करा. लिपस्टिक आणि लिपग्लॉस यांचा रंग एकमेकांशी मिळताजुळता असायला हवा. लिपग्लॉस लावताना ओठांच्या मध्यभागी त्याने एक उभी रेघ मारा आणि त्यानंतर त्या रेघेपासून ओठांवर  उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला लिपग्लॉस पसरवा. लिपग्लॉस लावताना तो ओबडधोबड लावू नका.  एकदा ब्रश ओठांवर ठेवला की तो शेवटपर्यंत न्या. यामुळे ओठ चांगले चमकतील.

 

Web Title: How to get glass lip look, 5 tips that makes your lips glossy and shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.