उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे प्रत्येकाचा चेहरा काळपट, निस्तेज दिसतो. आजकाल मुली कुठेही समारंभाला जाताना पार्लरमध्ये खूप पैसे खर्च करून त्वचेच्या ट्रिटमेंट्स घेतात. परंतु नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेला फेस पॅक तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या पोषण देण्यासोबत ग्लो वाढवण्यास मदत करतो. (Summer Skin Care Tips) या उपायामुळे चेहरा तजेलदार प्रफुल्लित दिसेल आणि पार्लरच्या खर्चातूनही तुमची बचत होईल. घरच्याघरी फेशियल करण्यासाठी तुम्हाला जास्त काही सामान लागणार नाही. मोजक्या साहित्याचा वापर करून तुम्ही ग्लोईंग चेहरा मिळवू शकता. (How To Get Glowing Skin At Home)
लग्न, समारंभाच्या किमान दोन ते तीन महिने आधी स्किन केअरची सुरुवात करणे चांगले. जसजसे महत्वाच्या कार्यक्रमाचे दिवस जवळ येतात तसतसे ग्लोईंग चेहरा असावं असं सगळ्यांनाच वाटतं. बाह्य सौंदर्य मिळवणे सोपे आहे पण खरे सौंदर्य आतून येते आणि ते फक्त चांगले खाणेच देऊ शकते, फळे आणि भाज्यांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे चेहऱ्यासाठी तसेच शरीरासाठी खूप चांगले असतात. (Four step home remedies to get that perfect bridal glow) शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन, टोफू सारखे पदार्थ खाणं त्वचेसाठी उत्तम ठरेल पाण्याचे सेवन वाढवा आणि तुम्ही दररोज किमान तीन लिटर पाणी प्या. जेवणानंतर कॉफी किंवा चहा पिणे टाळा.
फेसमास्क
१) लिंबाचा रस, मुलतानी माती समान प्रमाणात घेऊन चेहऱ्यावर व मानेवर लावावे. हा मास्क कोरडा होईपर्यंत राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवा. हीच पद्धत तेलकट त्वचेसाठी वापरली जाऊ शकते परंतु पाणी वापरण्याऐवजी गुलाब पाण्याने मास्क काढा.
२) मध, गुलाबजल, दही समप्रमाणात घेऊन चेहऱ्यावर व मानेवर लावावे. ते कोरडे होईपर्यंत तसाच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
३) ज्या लोकांना त्यांच्या त्वचेचा प्रकार माहित नाही किंवा त्यांची त्वचा मिश्र आहे त्यांनी, तेलकट आणि सामान्य त्वचेसाठी चालेल असा पॅक वापरा. त्वचेच्या गरजेनुसार, वेगळे फेस पॅक लावता येतात. सामान्य त्वचेच्या प्रकारासाठी कोरफड (1 टेस्पून), टोमॅटो (1 टेस्पून), लिंबू (1/2 टिस्पून). हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर आणि मानेवर १५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.
आंघोळ केल्यानंतर, नियमितपणे आपल्या त्वचेची काळजी घ्या. तेलाचे दोन-तीन थेंब (व्हर्जिन कोकोनट ऑईल, ऑलिव्ह ऑईल) टाकून मसाज करा. तेल केवळ त्वचेला आर्द्रता देत नाही तर कीटक चावणे, पुरळ आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून बचाव करणारा एक संरक्षणात्मक थर देखील तयार करतो. रोज तेल वापरल्याने टॅनही कमी होईल. हळदीच्या औषधी प्रभावासाठी आणि हळद आणि बेसनचा स्क्रब हा पॅक वापरा. संपूर्ण शरीरावर लावा आणि पाच मिनिटे ठेवा नंतर धुवून टाका. मुलतानी मातीचाही वापर बॉडी ग्लोसाठीही करता येतो.