Join us  

काळ्या डागांनी चेहरा खराब झालाय? किचनमधला १ पदार्थ, चेहरा होईल नितळ-डाग कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 3:16 PM

How to Get Glowing Skin using Besan : बेसन त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून देखील कार्य करते.

पिंपल्सच्या डागांनी चेहरा खराब होणं ही खूपच कॉमन समस्या आहे. पिंपल्स  १ आठवड्यात जातात पण त्याचे डाग मात्र वर्षानुवर्ष त्वचेवर तसेच राहतात. वारंवार क्रिम्स लावूनही हवातसा ग्लो मिळत नाही. (Skin Care Tips) चेहऱ्यावरचे डाग काढून टाकण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला मदत करू शकतात. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात बेसन पीठ  असतंच. बेसन पिठाचा वापर त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. (Skin Care Tips For Glowing Skin)

बेसनाचे त्वचेला फायदे

१) बेसनाचा नियमित वापर केल्याने त्वचा घाण, विषारी पदार्थ आणि इतर अशुद्धीपासून मुक्त होते, त्यामुळे त्वचा पूर्णपणे स्वच्छ राहते.

२) बेसनाचे पीठ डागांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्वचेचा टोन देखील सुधारण्यासाठी ओळखले जाते, ज्यामुळे ते चमकदार प्रभाव देते.

३) त्वचेतील सीबम पातळी संतुलित करण्यासाठी बेसन देखील चांगले आहे. ते त्वचेचा नैसर्गिक ओलावा काढून टाकल्याशिवाय तेल काढून टाकते आणि ते मऊ राहते.

४) बेसन हे देखील एक उत्तम एक्सफोलिएटिंग एजंट आहे. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून देखील कार्य करते. ज्यामुळे त्वचा टवटवीत आणि ताजीतवानी राहते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स