चेहऱ्याला तूप लावल्यानं चेहऱ्याला मॉईश्चर आणि पोषण दोन्ही मिळते ज्यामुळे चेहरा मुलायम, कोमल आणि चमकदार दिसतो. यातील इसेंशियल फॅटी एसिड्स आणि व्हिटामीन्स त्वचेच्या कोरडेपणाशी लढण्यास मदत करतात (How To Use Ghee On Your Face) . यात नैसर्गिक इमोलिएंट गुण असतात जे त्वचेचा रंग उजळवण्याबरोबरच डाग- कमी करण्यास फायदेशीर ठरतात. ज्यामुळे चेहऱ्याला चमक येते. नुसतं तूप लावण्याऐवजी तुम्ही यात ३ पदार्थ मिसळून त्वचेला लावू शकता. त्वचेसाठी हे जास्त फायदेशीर ठरेल. चेहऱ्याला तूप कसे लावावे समजून घेऊ. (Ghee For Skin Care)
कॉस्मो डर्मा रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार तूपात व्हिटमीन के, व्हिटामीन ए असते जे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. व्हिटामीन के मुळे कोलोजनचे उत्पादन वाढते. तुपामुळे तुमचे लूक्स सुधारतात. व्हिटामीन के नॅच्युरल मॉईश्चरायजिंग गुणांसह असते. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या कमी होते. ज्यामुळे फॅट लॉस आणि मसल्स लिन होण्यास मदत होते. कोमट तूप बदामाच्या तेलासोबत चेहऱ्याला लावा आणि रात्रभर तसंच ठेवा या उपायामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल. तुपाचे 2 ते 3 थेंब चेहऱ्याला लावल्यानं पिंपल्स येणं कमी होतं. रात्री ओठांना तूप लावल्यानं ओठ मऊ राहतात. (Top 3 Methods To Use Ghee On Face)
तूपात मध घालून लावा
मधासोबत तूप मिसळून तुम्ही चेहऱ्याला लावू शकतात. कारण या दोन्हींमध्ये मॉईश्चराईयजिंग गुण असतात. ज्यामुळे शरीराला पुरेसं हायड्रेशन मिळतं. सुरकुत्या, फाईन लाईन्सची समस्या कमी होते. हे दोन्ही पदार्थ मिक्स करून तुम्ही १० ते १५ मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवू शकता. नंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होतील.
तूपासोबत बेसन
तूप आणि बेसन चेहऱ्याला लावण्याचा उपाय तुमच्या चेहऱ्यावर तेज आणेल. ज्यामुळे डाग, एक्ने आणि सुरकुत्या कमी होतील. यासाठी फक्त १ चमचा तूप घ्यावं लागेल त्यात १ चमचा बेसन मिसळा. नंतर १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर अप्लाय करा. पाण्यानं चेहरा क्लिन करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून ३ वेळा करू शकता.
तूप आणि मुल्तानी
तूप आणि मुल्तानी मातीचा उपाय हा परीणामकारक आहे. मुल्तानी मातीमुळे त्वचा आतून स्वच्छ होते. पिंपल्स कमी होतात नियमित याचा वापर केल्यानं सुरकुत्या कमी होतात. यासाठी मुल्तानी मातीचा फेस पॅक तयार करून त्यात तूप मिसळा. चेहऱ्यावर 5 मिनिटं लावून ठेवा नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा.