Join us  

राखीपौर्णिमा स्पेशल: पार्लरसाठी वेळच नाही? ३ पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावा; मिळेल फेशियलसारखा इंस्टंट ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 2:14 PM

RakshaBandhan 2024 Special: राखीपौर्णिमेच्या दिवशी छान दिसायचं आहे, पण पार्लरमध्ये जायला वेळच नाही मग हे काही उपाय करा, चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जाईल... (how to get instant glow on skin?)

ठळक मुद्देचेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करुन अवघ्या काही मिनिटांत घरच्याघरी चेहऱ्यावर सुंदर सोनेरी चमक आणायची असेल तर काय करावं ते पाहा...

राखीपौर्णिमेचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे (Raksha Bandhan 2024 Special). त्या सणाची छान तयारी सुरू आहे. भावासाठी जेवायला काय करायचं, त्याला औक्षण करताना कोणते कपडे घालायचे हे ठरलंय, त्या कपड्यांवर घालण्याची ज्वेलरी आणि हेअरस्टाईलही बऱ्यापैकी फायनल झाली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लिनअप करून घेण्यासाठी वेळच मिळत नाहीये, अशी अडचण अनेक बहिणींची झाली आहे. कारण इतकी सगळी कामं मागे असतात की पार्लरमध्ये निवांत जाऊन बसण्यासाठी वेळच मिळत नाही (1 simple home made face pack for getting golden glow on skin,). अशावेळी चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करुन अवघ्या काही मिनिटांत घरच्याघरी चेहऱ्यावर सुंदर सोनेरी चमक आणायची असेल तर काय करावं ते पाहा... (how to remove tanning and dead skin?)

चेहऱ्याला इंस्टंट ग्लो देणारे घरगुती फेसमास्क

 

पहिला उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ चमचा काॅफी पावडर, २ चमचे चंदन पावडर आणि ३ ते ४ चमचे मध लागणार आहे. हे तिन्ही पदार्थ एका वाटीमध्ये घ्या आणि व्यवस्थित कालवून एकत्र करा.

रिंकू राजगुरूला आवडतात अकलूजची प्रसिद्ध मर्डर भजी- बघा रेसिपी- रिमझिम पावसातली गरमागरम डीश

आता हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर २० मिनिटांनी हळूवार मसाज करत लेप काढून टाका आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्याने डेडस्किन आणि टॅनिंग दोन्ही निघून जाईल आणि त्वचा अतिशय मऊ- मुलायम होईल. हा उपाय rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

दुसरा उपाय 

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बेसनपीठ, चिमूटभर हळद आणि १ चमचा दही घ्या. हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या. त्यानंतर चेहरा थोडा ओलसर करा आणि हा लेप चेहऱ्यावर लावा.

राखीपौर्णिमेला भावासाठी गोड काय करावं? बघा साखर- कॅलरी कमी असणाऱ्या ५ सुपरहेल्दी मिठाई

त्यानंतर १० ते १५ मिनिटांत लेप जेव्हा अर्धवट सुकत आलेला असेल तेव्हा चेहरा किंचित ओला करा आणि लेप हाताने चोळून चोळून काढा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्वचा मुलायम तर होईलच, पण त्वचेवर छान सोनेेरी चमकही दिसेल.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी