Join us  

दिवाळीत डल-काळपट चेहरा नको? होमिओपॅथी डॉक्टर सांगतात १ उपाय, चेहऱ्यावर येईल तेज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 1:33 PM

How To Get Instant Glowing Skin With Chandan : चेहऱ्याशी संबंधित त्रास टाळणायासाठी होमिओपॅथी फेस पॅकसुद्धा लावू शकता.

आजकाल तरूण-तरूणी (Beauty Tips) चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर करतात कारण त्यांना झटपट  चेहऱ्यावर ग्लो हवा असतो. केमिकल्सयुक्त  कॉस्मॅटिक्सचा वापर केल्यामुळे त्वचा ड्राय होणं, पिंपल्स येणं, त्वचा  कोरडी होणं अशा समस्या उद्भवतात. चेहऱ्याशी संबंधित त्रास टाळणायासाठी होमिओपॅथी फेस पॅकसुद्धा लावू शकता.  होमिओपेथीनं अनेक समस्यांवर उपाय शोधता येतात. (How To Get Instant Glowing Skin With Chandan Remedy By Homeopathy Doctor)

होमिओपेथी डॉक्टर हेमंत श्रीवास्वत यांनी चमकदार त्वचेसाठी एक उपाय सांगितला आहे.  यामुळे त्वचेचं कोणतंही नुकसान होत नाही. असं मानलं जातं की हा होमिओपेथी उपाय खूपच फायदेशीर आहे. कारण रोपं,एनिमल इसेंस, मिनरल्सचा वापर करून हे तयारे केले जाते. होमिओपेथी डॉक्टरांनी सुचवलेला हा फेसपॅक लावून तुम्ही वयापेक्षा अधिक तरूण दिसू शकता. (Right Way To Use Chandan Face Pack)

फेस पॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Chandan Face Pack)

१) हळद - २ चमचे

२) एलोवेरा जेल- १ चमचा

३) चंदन पावडर - २ चमचे

४) लिंबाचा रस - १ चमचा

५) पाणी - दीड वाटी

फेसपॅक तयार करण्याासठी सगळ्यात आधी एक वाटी घ्या त्यात अर्ध पाणी भरून हळद घाला नंतर मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. नंतर या पेस्टमध्ये चंदन पावडर आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिसळा.  हा पॅक जास्त पातळ करू नका.

फक्त १५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाची कुरकुरीत चकली; ना तेलकट-ना किचकट करा झटपट चकली

ही पेस्ट ओलसर झाल्यानंतर यात गरजेनुसार चंदन पावडर मिसळा. तयार आहे चंदनाचा फेस पॅक हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटं तसंच राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. या उपायानं त्वचेचा डलनेस निघून जाईल आणि चेहरा चमकेल. चंदनाच्या फेसपॅकला तुम्ही नेहमीच्या रूटीनचा एक भाग बनवू शकता. ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारेल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी