Lokmat Sakhi >Beauty > कांद्याचं खास हेअर टॉनिक केसांवर लावा; कंबरेपर्यंत वाढतील केस; केसाचं गळणं कायमच थांबेल

कांद्याचं खास हेअर टॉनिक केसांवर लावा; कंबरेपर्यंत वाढतील केस; केसाचं गळणं कायमच थांबेल

How to get long hairs : काद्यांत एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शनशी लढण्यास मदत होते. केसांना कांदा लावल्यान केस वाढण्यास मदत होते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 05:40 PM2023-07-06T17:40:32+5:302023-07-06T23:39:53+5:30

How to get long hairs : काद्यांत एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शनशी लढण्यास मदत होते. केसांना कांदा लावल्यान केस वाढण्यास मदत होते

How to get long hairs : How to get long hairs using onion sirum How to grow long hair with onion | कांद्याचं खास हेअर टॉनिक केसांवर लावा; कंबरेपर्यंत वाढतील केस; केसाचं गळणं कायमच थांबेल

कांद्याचं खास हेअर टॉनिक केसांवर लावा; कंबरेपर्यंत वाढतील केस; केसाचं गळणं कायमच थांबेल

वातावरणात बदल होताच हेअर फॉलची समस्या उद्भवते. यापासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करावा लागतो. पण या उत्पादनांचा केसांना काही खास परीणाम झालेला दिसत नाही. (Benefits of Using Onion Hair Serum On the Scalp) केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही हेअर सिरम तयार करू शकता. (How to grow long hair with onion) 

काद्यांत एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शनशी लढण्यास मदत होते. केसांना कांदा लावल्यानं केसांची वाढ चांगली  होते. याव्यतिरिक्त अतिरिक्त केस गळतीही थांबवते येते. केस पांढरे होणं रोखण्यापासून केसांची वाढ होईपर्यंत अनेक समस्या यामुळे दूर होतात. (How To Use Onion Hair Serum) 

कांद्याचे हेअर सिरम कसे बनवावे

कांद्याचे हेअर सिरम बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक कांदा घ्या. कांद्याचे साल काढून कांदा चिरून ग्राईंडरमध्ये घाला. कांदा बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. नंतर एका सुती कापडाच्या मदतीनं कांद्याचा रस पिळून घ्या आणि कांद्याची जाड पेस्ट बाजूला काढा. यात तुम्ही नारळाचं तेल, जोजोबा तेल आणि एरंडेल तेल घाला. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून एका डब्यात भरून घ्या.  कांद्याचे हेअर सिरम केसांना लावण्यासाठी सगळ्यात आधी कॉटन बॉल्स घ्या. त्यानंतर १ तास केसांना लावून ठेवा. नंतर कोमट पाणी आणि शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा. यामुळे इन्फेक्शनशी लढण्यास मदत होते.  यामुळे केसाचं गळणंही कमी होते. 

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते कांद्याचा रस लावल्यानं केसांची वाढ भराभर होते.  पण हा उपाय प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरेल असं नाही. कांद्याच्या रसानं  केस वेगान उगवतात असा अनेकांचा समज  असतो. पण याचा सकारात्मक रिजल्ट येण्यासाठी अनेक आठवडे लागतात. म्हणूनच केसांवर कोणतेही उपाय करण्याासाठी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पाणी पिताना ५ गोष्टी चुकूनही करू नका; आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात पाणी पिण्याची योग्य पद्धत...

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस कितपत परिणामकारक आहे यावर संशोधन फार मोठ्या प्रमाणावर झालेले नाही. जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका छोट्याशा संशोधनातून असे दिसून आले आहे की कांद्याचा रस टाळूवर लावल्यास काही लोकांचे केस पुन्हा वाढू शकतात.  या संशोधनात असे आढळून आले की, कांद्याचा रस दिवसातून दोनदा लावल्यास केसांची वाढ 2 आठवड्यात सुरू होते. सुमारे 74 टक्के सहभागींचे केस 4 आठवड्यांनंतर वाढले. त्याच वेळी, 6 आठवड्यांत, सुमारे 87 टक्के सहभागींचे केस वाढले होते.

Web Title: How to get long hairs : How to get long hairs using onion sirum How to grow long hair with onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.