Join us  

केस खूपच पातळ झालेत? नियमित खा हे ५ आंबट पदार्थ, भराभर केसांची वाढ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 7:42 PM

How to Get Long Hairs In A Week : व्हिटामीन सी युक्त फळं केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे केस लांबच लांब होतात आणि वाढही चांगली होते.

अधिकाधिक लोकांना केसांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. (Hair Fall Solution) ज्यामुळे केस गळणं, केस तुटणं अशा हेअर प्रोब्लेम्सचा सामना करावा लगतो. वातावरणातील बदल, प्रदूषण, पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात आणि केस तुटू लागतात. ( 5 Fruits For Long Hairs ) केसांच्या  चांगल्या आरोग्यासाठी लाईफस्टाईलच्या काही सवयींमध्ये बदल करायाल हवा. व्हिटामीन सी युक्त फळं केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे केस लांबच लांब होतात आणि वाढही चांगली होते.(How to Get Long Hairs In A Week)

केसांना पोषण देणारे ५ पदार्थ कोणते?

1) बेरीज-

व्हिटामीन सी आणि कोलेजन बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे केसांना पुरेपूर पोषण मिळते. व्हिटामीन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. व्हिटामीन सी केसांचे फ्री रॅडिकल्सपासून होणारे नुकसान वाचवते आणि केसांना पोषण देते

२) संत्री

संत्र्यात व्हिटामीन सी आणि सिट्रिक एसिड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे स्काल्पच्या समस्या दूर होतात आणि  केसांची वाढ चांगली होते. संत्र्याचे रोजच्या आहारात सेवन केल्यास  केस सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते.

३) किव्ही

किव्हीमध्ये व्हिटामीन सी बरोबरच व्हिटामीन ई सुद्धा मोठ्या प्रमाणात असते.  केसांच्या वाढीसाठी उत्तम आहे.  ज्यामुळे केस तुटणं कमी होतं केसांची वाढ होते. किव्हीच्या सेवनाने केसांना बरेच फायदे मिळतात. डायबिटीसच्या रुग्णांसाठी एक उत्तम फळ आहे. 

४) स्ट्राँबेरी

स्ट्राँबेरी व्हिटामीन सी आणि बायोटीनचा उत्तम स्त्रोत आहे.  जे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. केसांच्या वाढीसाठी स्ट्राँबेरी आवश्यक असते. आहारात या पदार्थाचा समावेश केल्याने स्काल्पशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते आणि केसांचे टेक्स्चरही  सुधारते. 

५) लिंबू

लिंबात व्हिटामीन सी बरोबरच पोटॅशियम, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे स्काल्प आणि केसांच्या आरोग्यास बरेच फायदे मिळतात. ज्यामुळे केस मुळापासून स्ट्राँग होतात. कोंड्याची समस्या टाळण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी तुम्ही लिंबाचा समावेश आहारात करायला हवा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी