Lokmat Sakhi >Beauty > केसांना वाढच नाही-रोज गळतात? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-मजबूत होतील केस

केसांना वाढच नाही-रोज गळतात? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-मजबूत होतील केस

How To Get Long Hairs Using Coconut Oil : नारळाच्या तेलाबरोबर काही पदार्थ मिसळून डोक्याला लावल्याने केस दाट आणि मजबूत होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:24 PM2024-08-12T13:24:58+5:302024-08-12T14:17:47+5:30

How To Get Long Hairs Using Coconut Oil : नारळाच्या तेलाबरोबर काही पदार्थ मिसळून डोक्याला लावल्याने केस दाट आणि मजबूत होतील.

How To Get Long Hairs Using Coconut Oil : Mix These 4 ingredients in Coconut Oil To Get Long Hairs | केसांना वाढच नाही-रोज गळतात? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-मजबूत होतील केस

केसांना वाढच नाही-रोज गळतात? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-मजबूत होतील केस

नारळाचे तेल (Coconut Oil) अनेक वर्षांपासून हेअर केअर उत्पादनांमध्ये वापरले जात आहे. हे तेल लावल्याने केस लांब आणि मजबूत होतात. नारळाचे तेल लोकांची पहिली पसंती मानली जाते. आपले केस लांब-दाट असावेत असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. (Hair Care Tips) मजबूत आणि लांब केसांसाठी नारळाच्या तेलाचा केसांवर अनेक वर्षांपासून वापर केला जात आहे. नारळाच्या तेलाबरोबर काही पदार्थ मिसळून डोक्याला लावल्याने केस दाट आणि मजबूत होतील. (Mix These 4 ingredients in Coconut Oil To Get Long Hairs)

एलोवेरा जेल

नारळाच्या तेलात एलोवेरा जेल मिसळून केसांना लावल्यानं केसांची हरवलेली चमक परत येण्यास मदत होते. याशिवाय केस नैसर्गिकरित्या चमकतात. नॅशनल लायब्रेरीच्या रिपोर्टनुसार एलोवेरा जेल केसांना लावल्यानं केस लांबसडक आणि दाट होतात. (Ref) एलोवेरा जेल केसांना लावल्याने डॅमेज केस रिपेअर होण्यास मदत होते. नियमित एलोवेरा जेल केसांना लावल्यास केसांची चमक परत येण्यास मदत होते.

जेवणानंतर फक्त १ चमचा 'या' बिया खा; कोलेस्टेरॉल-बीपी कंट्रोलमध्ये येईल; पोट नीट साफ होईल

केस मजबूत होतात इतकंच नाही तर केसांमध्ये खाज येणं, जळजळ होणं या समस्याही टाळता येतात. याशिवाय केस हेल्दी बनतात. केसांची चांगली वाढ होते आणि केस कंबरेपर्यंत लांब होतात. तेलकट केसांची समस्या दूर होण्यासही मदत होते. यामुळे सिबम प्रोडक्शन कंट्रोल करता येते, हेअर फॉलचा त्रास रोखता येतो.

कडुलिंबाची पानं

कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवून नारळाच्या तेलात मिसळून ही पावडर आपल्या केसांना लावा. त्यानंतर १ ते २ तासांसाठी तसंच ठेवून शॅम्पूने केस धुवून घ्या ही प्रक्रिया आठवड्यातून २ वेळा करा. असं केल्यानं केस गळणं बंद होईल आणि केस मुळापासून मजबूत होतील.

दालचिनी पावडर

नारळाच्या तेलाबरेबर तुम्ही दालचिनीची पावडर मिसळून लावू शकता. असं केल्यानं तुमचे केस मजबूत होतील याशिवाय केसांमध्ये कोंडा होण्याची समस्याही उद्भवणार नाही. ज्यामुळे केस गळणं कमी होईल.

व्हिटामीन ई ऑईल

नारळाच्या तेलात व्हिटामीन ई ऑईल घालून तुम्ही केसांवर लावू शकता. असं केल्यानं केस मजबूत होतील याशिवाय केसांना फाटे फुटण्याची समस्या उद्भवणार नाही. नारळाच्या तेलाबरोबर तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पावडर, दालचिनी पावडर आणि व्हिटामीन ई ऑईल घालून लावू शकता. 

Web Title: How To Get Long Hairs Using Coconut Oil : Mix These 4 ingredients in Coconut Oil To Get Long Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.