आपले केस लांबसडक, दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. लांब केस प्रत्येकालाच आवडतात. केमिकल्सयुक्त हेअर केअर प्रोडक्टसचा वापर केल्यास केसांचे नुकसान होते आणि केस गळायला सुरूवात होते. केस खराब होऊ नयेत यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Hair Care Tips) काही घरगुती पदार्थ शॅम्पूत मिसळून केसांना लावल्यानं केस दाट होण्यास मदत होते. शॅम्पू केसांना लावल्यानं केस १० पटींनी जास्त वाढतात. (How To Get Long Hairs Using Home Remedies)
केस वाढवण्याचा असरदार उपाय कोणता?
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार काही लागणार नाही फक्त नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही लांबसडक, दाट केस मिळवू शकतात. हा शॅम्पू तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. यामुळे केस वाढण्यास मदत होईल. याशिवाय हेअर ग्रोथ होण्यास मदत होईल.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल?
१) मेथीचे दाणे- २ चमचे
२) कढीपत्ता - १ वाटी
३) एलोवेरा -१ वाटी
४) पाणी - २ ग्लास
सगळ्यात आधी एक भांडं घ्या. त्यात २ ग्लास पाणी घालून गॅसवर मध्यम आचेवर गरम करून घ्या. त्यानंतर पाण्यात मेथीचे दाणे, कढीपत्ता आणि एलोवेरा घालून व्यवस्थित शिजवून घ्या. नंतर संपूर्ण पदार्थ पाण्यात घालून पॅनमधलं पाणी अर्ध होईपर्यंत शिजवा. नंतर हे पाणी एका बाऊलमध्ये गाळून घ्या त्यानंतर एका वाटीत पाणी घेऊन नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्या.
शरीरातील हाडांना एकदम पोकळ बनवते व्हिटामीन B-12 ची कमी; 5 लक्षणं दिसताच सावध व्हा
थंड झाल्यानंतर एका वाटीत आपला आवडत्या शॅम्पूचं पाकीट घालून १ चमचा शॅम्पू मिसळून व्यवस्थित मिश्रण तयार करा. अंघोळीच्या पाण्यात हे घाला. ५ मिनिटं या पाण्याने केसांची मसाज करा. फेस तयार झाल्यानंतर हेअर वॉश करा. २ आठवडे हा उपाय केल्यास केसांची लांबी चांगली वाढेल आणि केस दाट-लांबसडक होतील.
कढीपत्ता केसांवर वापरण्यामागे अनेक कारणं आहेत. कढीपत्त्यामुळे केस काळे राहण्यास मदत होते. कढीपत्त्यात प्रोटीन, बी ६, बीटा कॅरोटीन असते. ज्यामुळे केस कमजोर आणि पातळ होणं रोखता येतं तसंच केस मुळापासून मजबूत होतात. मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन्स आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे केस मजबूत होतात. याशिवाय यातील लेसिथिन स्काल्प हेअर फॉलिक्सला हेल्दी बनवण्यासही मदत करतात.