केस गळण्याचा त्रास काही नवीन नाही पण यामुळे पूर्ण पर्सनॅलिटीवरही परिणाम होतो. लांबसडक दाट दिसावेत असं प्रत्येकालाच वाटतं. (Hair Care Tips) केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. (Hair Growth Hair) पोषणाची कमतरता भासल्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. (How to Grow Hairs Using Natural Home Remedies)
केस तुटतात किंवा केस जास्तीत जास्त गळू लागतात, केस तुटू लागतात. केस मुलायम हवे असल्यास काही घरगुती उपाय करू शकता. (Kes galan thambvnyasathi Gharguti Upay) यातून केसांना योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळतात. केमिकल्सची झंझटही नसते. (Home Remedies For Hair Growth)
१) कढीपत्त्याचे तेल
रिसर्च जर्नल ऑफ फार्माकोजनॉजी एण्ड फायटो केमिस्ट्रीच्या रिपोर्टनुसार कढीपत्ता केसांसाठी उपयुक्त आहे कारण यात बीटा कॅरोटीन आणि प्रथिन जास्त असतात. केस गळणं थांबवण्यासाठी हे गुणकारी ठरते. यात अमिनो एसिड्सही असतात. (ref) कढीपत्ता केसांसाठी केसांसाठी टॉनिकप्रमाणे काम करतो. नारळाच्या तेलात कढीपत्ता घालून उकळवून घ्या. कढीपत्ता गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा त्यानंतर १ तासाने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांवर वेगळी चमक येईल.
२) आवळा
आवळा केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. ज्यामुळे केस मजबूत, दाट राहण्यास मदत होते. आवळ्याचा ज्यूस काढून याचे सेवन करू शकता किंवा या रसाचे सेवन करू शकता. आठवड्यातून कमीत कमी २ वेळा केसांना लावा. ज्यामुळे त्वचा आणि केस मजबूत राहण्यास मदत होते.
केस गळणं वाढलंय? जावेद हबीब सांगतात किचनमधला १ पदार्थ वापरा; दाट होतील केस
३) एलोवेरा
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरते. एक कप एलोवेरा जेलमध्ये जवळपास २ मोठे चमचे मध घालून व्यवस्थित एकजीव करा. ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा. २० ते ३० मिनिटं तसंच ठेवून द्या. नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांवर वेगळी शाईन आलेली दिसेल.
ओटी पोट लटकतंय-मागून फिगर जाड दिसते? सकाळी उपाशी पोटी 'हा' पदार्थ घ्या-स्लिम व्हाल
४) मेथी
मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे केसांचा विकासही होतो. कोंड्याच्या समस्या उद्भवत नाहीत. केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस तुटतही नाहीत. केसगळती थांबवण्यासाठी मेथीच्या बिया उत्तम उपाय आहे. नारळाच्या किंवा मोहोरीच्या तेलात मेथीचे दाणे घालून ते गरम करून केसांना व्यवस्थित मसाज केल्यास केस गळती उद्भवत नाही.