नवरात्र म्हटलं की आपल्याला गरबा आठवतो. रात्र - रात्र जागून तासंतास गरबा खेळल्याशिवाय नवरात्र अपूर्णच आहे. नवरात्रीत आपण गरबा खेळलो नाही असे होऊच शकणार नाही. काहीजण तर गरबा खेळण्यासाठीच नवरात्रीची आवर्जून वाट बघत असतात. सण म्हटलं की मग कोणताही सण असो प्रत्येक सणावाराला महिला आपली नटण्या - मुरडण्याची हौस भागवून घेतात. गरबा खेळायला जायचं म्हटलं की मस्त मोठमोठाले घेरदार घागरे, मॅचिंग दुप्पटा, हेअरस्टाईल, मेकअप असं सगळं छान आवरुन आपण बाहेर पडतो(How To Create A Sweat Proof Makeup Look On Navratri).
आपण कितीही व्यवस्थित नीटनेटकं आवरुन गरबा खेळायला गेलो तरीही नाचून - गरबा खेळून येणाऱ्या घामामुळे आपला मेकअप खराब होतो. गरबा खेळताना सतत येणाऱ्या घामामुळे काहीवेळा आपला मेकअप पुसला जातो. असे होऊ नये यासाठी आपण शक्यतो वॉटरप्रूफ मेकअप करण्यावर अधिक भर देतो. मेकअप वॉटरप्रूफ (How to do Sweat Proof Makeup for This Garba Nights) असला तर तो घाम आल्याने लगेच पसरत नाही किंवा खराब होत नाही. आजकाल बाजारांत मिळणारे बहुतेक ब्यूटी प्रॉडक्ट्स हे शक्यतो वॉटरप्रूफच असतात, पण जर आपल्याकडे वॉटरप्रूफ ब्यूटी प्रॉडक्ट्स नसतील तर आहे त्याच ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करुन आपला मेकअप वॉटरप्रूफ कसा करता येईल ते पाहूयात(How to Get Long-Lasting Sweat Proof Makeup for Navratri Garba).
मेकअप वॉटरप्रूफ करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. लिक्विड फाउंडेशन - १ टेबलस्पून
२. सेटिंग पावडर - १ टेबलस्पून
३. मॉइश्चरायझर - १ टेबलस्पून
४. प्रायमर - १ टेबलस्पून
५. सेटिंग स्प्रे - १ टेबलस्पून
नवरात्रीत रुजवण घालण्याची पाहा ‘ही’ सोपी पद्धत, येईल हिरवागार कोवळा सुंदर बहर...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका काचेच्या बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून लिक्विड फाउंडेशन, सेटिंग पावडर, इल्युमनेटिंग मॉइश्चरायझर, प्रायमर, सेटिंग स्प्रे घेऊन ते मेकअप ब्रशच्या मदतीने एकजीव करुन घ्यावे.
२. आता या तयार लिक्विडचा एक बेस ब्रशच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यावा.
३. त्यानंतर आपण आपल्या आवडीप्रमाणे लिपस्टिक, काजळ, आयलायनर लावून आपला गरबा लूक पूर्ण करु शकता.
अशाप्रकारे गरबा खेळताना घाम येऊन मेकअप खराब होऊ नये किंवा पुसला जाऊ नये म्हणून मेकअप करताना हा बेस तयार करून सगळयात आधी चेहऱ्याला लावून घ्यावा.
पापण्यांवर आर्टिफिशियल आयलॅशेज लावताना होते गडबड, सोप्या ६ स्टेप्स- डोळेही राहतील सुखरुप...