Lokmat Sakhi >Beauty > How to get long thick hair naturally : केस खूप गळतात; तेल, शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाहीये? घरीच कांदा वापरून मिळवा दाट, लांब केस

How to get long thick hair naturally : केस खूप गळतात; तेल, शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाहीये? घरीच कांदा वापरून मिळवा दाट, लांब केस

How to get long thick hair naturally : कांद्याच्या रसामध्ये असलेले सल्फर तुम्हाला दाट आणि मजबूत केस देण्यास मदत करते. सल्फर कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते, ज्यामुळे तुमच्या टाळूची त्वचा निरोगी राहते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 07:03 PM2022-02-17T19:03:00+5:302022-02-17T19:24:02+5:30

How to get long thick hair naturally : कांद्याच्या रसामध्ये असलेले सल्फर तुम्हाला दाट आणि मजबूत केस देण्यास मदत करते. सल्फर कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते, ज्यामुळे तुमच्या टाळूची त्वचा निरोगी राहते. 

How to get long thick hair naturally : Suffering from hair loss try this homemade onion oil for stronger and thicker hair   | How to get long thick hair naturally : केस खूप गळतात; तेल, शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाहीये? घरीच कांदा वापरून मिळवा दाट, लांब केस

How to get long thick hair naturally : केस खूप गळतात; तेल, शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाहीये? घरीच कांदा वापरून मिळवा दाट, लांब केस

केस गळणे आणि कोंडा होणे या आजच्या काळात सामान्य समस्या आहेत. केस चांगले राहण्यासाठी प्रत्येकजण नवनवीन उपाय शोधण्याच्या प्रयत्नात असतो. अनेकदा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्स घेऊनही हवातसा फरक जाणवत नाही. संशोधक आणि त्वचा शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्याचा रस केस गळतीस मदत करू शकतो कारण त्यात  सल्फर आहे. (How to get long and strong hairs naturally) जे तुमच्या टाळूसाठी पोषक घटक आहे. कांद्याच्या रसामध्ये असलेले सल्फर तुम्हाला दाट आणि मजबूत केस देण्यास मदत करते. सल्फर कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते, ज्यामुळे तुमच्या टाळूची त्वचा निरोगी राहते. (onion juice for hair growth)

कांद्याचे केसांसाठी फायदे (Onion benefits for hair)

कांदायुक्त उत्पादने बुरशी आणि बॅक्टेरियाशी लढू शकतात आणि केस संक्रमणापासून मुक्त ठेवू शकतात. कांद्यामध्ये जास्त प्रमाणात सल्फर असते जे केसांना चांगल ठेवण्यास आणि केसांचे follicles पुन्हा निर्माण करण्यास मदत करते.

जर तुम्ही तुमच्या टाळूवर कांद्याचा गर वापरत असाल तर ते तुमच्या टाळूमधील पोषक तत्वे भरून काढण्यास मदत करू शकते. कांद्यामध्ये असलेले नैसर्गिक आणि प्रभावी अँटिऑक्सिडंट केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करतात.

केस खूप पांढरे झालेत? घरच्याघरीच बीटाची 'अशी' पेस्ट लावून मिळवा नॅच्युरल रेड हेअर्स

आपल्या केसांवर नियमितपणे आणि दीर्घ कालावधीसाठी कांदा-मिश्रित उत्पादने वापरल्याने, आपल्या केसांना नैसर्गिक चमक देखील मिळते.

कांद्याचा गर आणि रस दोन्ही अतिशय तिखट असतात. हे उवांवर उपचार करण्यास मदत करते आणि भविष्यात उवांचा प्रादुर्भाव टाळते. नियमितपणे लावल्यास केस वाढण्यास मदत होते.  कांद्याचा रस टाळूमध्ये रक्त परिसंचरण देखील वाढवतो, परिणामी केसांची वाढ चांगली होते.

कांद्याचे तेल घर कसे बनवायचे? (How to Use Onion Juice for Hair Growth)

50 ग्रॅम कांद्याचा गर तयार करण्यासाठी ब्लेंडरमध्ये पुरेसे कांदे घ्या. एका पॅनमध्ये 200ml किंवा 300ml किंवा खोबरेल किंवा तिळाच्या तेलाचे मिश्रण घाला. आता पॅनमध्ये कांद्याचा रस घालून पेस्ट करा. गॅस चालू करा आणि उकळू द्या. प्रथम उकळल्यानंतर, गॅस कमी करा आणि मिश्रणापासून तेल वेगळे होईपर्यंत ते उकळू द्या. एक बारीक आणि स्वच्छ कापडाचा तुकडा घ्या आणि त्यातून तेल चाळून घ्या. तेल घट्ट डब्यात ठेवा.

रोज पावडर लावून घराबाहेर पडता? परफेक्ट लूकसाठी कॉम्पॅक्ट अन् लूज पावडरमध्ये काय फरक असतो,जाणून घ्या

कांद्याचा रस किती दिवस साठवता येऊ शकतो

प्रत्येक वेळी तुम्ही उत्पादन वापरत असताना कांद्याचा रस/गर जितकं ताजं बनवाल तितकं चांगले आहे. तुम्ही कांद्याचा रस 4-5 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता, परंतु कालांतरानं त्याचा वास येऊन रस खराब होतो.

कांदायुक्त उत्पादनं कितीवेळ केसांवर ठेवावीत?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कांदायुक्त उत्पादनं गरजेपेक्षा जास्तवेळ केसांवर ठेवू नयेत. टाळू संवेदनशील असल्यास अशी उत्पादनं जास्तवेळ केसांवर ठेवणं नुकसानकारक ठरू शकतं. 

Web Title: How to get long thick hair naturally : Suffering from hair loss try this homemade onion oil for stronger and thicker hair  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.