Lokmat Sakhi >Beauty > सतत केस गळतीला कंटाळलात? झोपताना हा पदार्थ केसांना लावा-महिन्याभरात घनदाट होतील केस

सतत केस गळतीला कंटाळलात? झोपताना हा पदार्थ केसांना लावा-महिन्याभरात घनदाट होतील केस

How To Get Long Thick Hairs Naturally : दही आणि मधाचं मिश्रण केसांसाठी नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 05:13 PM2024-12-11T17:13:48+5:302024-12-11T17:41:02+5:30

How To Get Long Thick Hairs Naturally : दही आणि मधाचं मिश्रण केसांसाठी नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते.

How To Get Long Thick Hairs Naturally : Apply These Thing At Night To Hairs And Get Long Hairs | सतत केस गळतीला कंटाळलात? झोपताना हा पदार्थ केसांना लावा-महिन्याभरात घनदाट होतील केस

सतत केस गळतीला कंटाळलात? झोपताना हा पदार्थ केसांना लावा-महिन्याभरात घनदाट होतील केस

केस गळण्याच्या समस्येनं प्रत्येकजण त्रस्त  असतो. आपले केस लांबसडक, दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसांना हेल्दी बनवण्यासाठी बाजारात बऱ्याच ट्रिटमेंट्स उपलब्ध आहेत पण याचा फारचा उपयोग  दिसून येत  नाही (How To Get Long Thick Hairs Naturally).तुम्हाला नैसर्गिक पद्धतीनं केस वाढवायचे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून केसांना लांब, दाट बनवू शकता. झोपण्याआधी काही खास पदार्थ केसांना लावून तुम्ही केसांचे  आरोग्य सुधारू शकता. (Apply These Thing At Night To Hairs And Get Long Hairs)

अमेरिकन एकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोशियेशनच्या रिपोर्टनुसार केस चांगले ठेवण्यासाठी केसांना शॅम्पूने घासणं टाळायला हवं, कंडीशनर लावणं टाळा, टॉवेलनं रब करून केस पुसू नका, केस ओले असताना अजिबात  विंचरू नका. हेअर कलर, हेअर डाय यांसारख्या केमिकल्सचा वापर टाळा. 

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

१) नारळाचं तेल

नारळाच्या तेलानं केसांच्या मुळांची मालिश केल्यानं केसांच्या मुळांना पोषण मिळते. ज्यामुळे केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. केसांमध्ये कोंडा होत नाही. हलक्या गरम नारळाच्या तेलानं केसांची मालिश करा आणि रात्रभर तसंच सोडून द्या आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा. या उपायानं केस मऊ, मुलायम होतील. केस तुटण्याची समस्या उद्भवणार नाही. तसंच केसांची वाढही भराभर होईल.

२) एलोवेरा जेल

एलोवेरामध्ये प्राकृतिक एंजाईम्स असतात ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. ताजं एलोवेरा जेल स्काल्पवर लावून हळूहळू मसाज करा. रात्रभर तसंच सोडून द्या. हा घरगुती उपाय  केल्यानं केसांची हरवलेली चमक परत येईल आणि केस दाट होतील.

३) कांद्याचा रस

कांद्याच्या  रसात सल्फर असते. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि नवीन केस उगवण्यास मदत  होते. कांद्याचा रस काढून केसांच्या मुळांना लावल्यास केस गळण्याच्या त्रासापासून सुटका होते आणि केस वेगानं वाढतात.

४) मेथीच्या बीया

मेथीच्या बीयांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड असते. ज्यामुळे केसांना पोषण मिळते. मेथीच्या बीया  रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट बनवून केसांच्या मुळांना लावा.

५) दही आणि मध

दही आणि मधाचं मिश्रण  केसांसाठी नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते.  दह्यात १ चमचा मध मिसळून केसांच्या मुळांना लावल्यानं या उपायाने केस सॉफ्ट, शायनी, मजबूत होतील.

Web Title: How To Get Long Thick Hairs Naturally : Apply These Thing At Night To Hairs And Get Long Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.