बऱ्याच जरी आपल्या रुटीनमध्ये एवढ्या जास्त अडकून गेलेल्या असतात की त्यांना स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मग त्वचेवरचे टॅनिंग वाढत जाते. डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन, डेड स्किनचे प्रमाणही वाढते. ब्लीच केलं तर त्वचेच्या या सगळ्या तक्रारी कमी होऊ शकतात. पण पार्लरमध्ये जाऊन बसण्याएवढा वेळ आपल्याकडे नसतो. कधी कधी तर या सगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्सवर जास्त पैसा खर्च करण्याची इच्छाही नसते (skin care for instant glow). म्हणूनच आता घरच्याघरी स्वस्तात मस्त इफेक्ट देणारे ४ पदार्थ वापरून नॅचरल पद्धतीने ब्लीच कसं करायचं ते पाहा....(best home remedies to remove tanning and dead skin)
घरच्याघरी ब्लीच कसं करायचं?
स्वयंपाक घरातलेच काही पदार्थ वापरून ब्लीच केल्यासारखा चमकदार चेहरा अवघ्या काही मिनिटांतच तुम्हाला हवा असेल आणि तो देखील अगदी कमी पैशांत तर rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आलेला हा उपाय लगेचच करून बघा.
गौरींच्या नैवेद्यात लाल भोपळ्याचे एवढे महत्त्व का? ६ फायदे- आरोग्यासोबतच घेतो सौंदर्याचीही काळजी
हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धे बीट रूट, अर्धा बटाटा, अर्धा टोमॅटो आणि अर्धे लिंबू लागणार आहे.
बीटरूटचे आणि बटाट्याचे साल काढून त्याच्या बारीक फोडी करा. टोमॅटोही चिरून घ्या आणि मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा.
यानंतर हाताने ते पदार्थ पिळून घ्या आणि त्यांच्यातलं पाणी वेगळं काढून घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस, एक टेबलस्पून डाळीचे पीठ आणि एक चमचा दही टाका.
भाग्यश्री सांगते प्रोटीन्सचा खजिना असणाऱ्या पॅटीसची खास रेसिपी! अतिशय चटपटीत- भरपूर पौष्टिक
सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि हा लेप तुमच्या चेहऱ्यावर २० ते २५ मिनिटांसाठी लावून ठेवा.
त्यानंतर हळुवारपणे चोळून चेहरा धुवून टाका. हा उपाय केल्यामुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेलही निघून जाईल. डेडस्किन, टॅनिंग जाऊन त्वचा छान उजळ दिसेल.