उन्हाळा म्हटलं की त्वचा खूप जास्त खराब होते. एकतर या दिवसांमध्ये ऊन एवढं जास्त असतं की त्यामुळे त्वचेचं टॅनिंग होतं. त्वचा खूप काळवंडून जाते. या दिवसांत खूप घाम- घाम होतो. त्यामुळे त्वचा डिहायड्रेट होण्याचं प्रमाणही वाढतं. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे या दिवसांत त्वचेचा पोत खूप खराब होतो आणि टॅनिंगमुळे त्वचेचा काळवंडून जाते (how to get naturally glowing skin using saffron or kesar). असं होऊ नये म्हणून काय करायचं आणि उन्हाळ्यातही आपली त्वचा चमकदारच राहावी यासाठी केशराचा कसा वापर करायचा ते आता पाहूया... (saffron face pack for radiant glow)
चमकदार त्वचेसाठी केशराचा वापर
१. प्रखर सुर्यकिरणांमुळे त्वचेचं नुकसान होऊ नये म्हणून केशराच्या २ ते ३ काड्या अगदी ४ ते ५ थेंब पाण्यात भिजत घाला.
हे पाणी तुमच्या नेहमीच्या सनस्क्रिन लोशनमध्ये टाका आणि मग ते चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेला उन्हापासून दुप्पट सुरक्षा मिळेल.
२. केशराच्या ४ ते ५ काड्या चमचाभर दुधामध्ये तासभर भिजत टाका. यानंतर या दुधाने चेहऱ्याला मसाज करा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केला तरी चालेल. हा उपाय केल्यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होऊन त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.
इस्त्रीला काळपट- चॉकलेटी डाग पडले? २ सोप्या ट्रिक पाहा- एका मिनिटांत इस्त्री नव्यासारखी दिसेल
३. रात्री झोपण्यापुर्वी ग्लासभर पाण्यात ४ ते ५ केशराच्या काड्या भिजत टाका. दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी रिकाम्यापोटी प्या. यामुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने तर चमकू लागेलच, पण आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरेल.