Lokmat Sakhi >Beauty > एक रुपयाही खर्च न करता ८ गोष्टी करा, कोरियन तरुणींसारखा चमकदार आणि सुंदर दिसेल चेहरा...

एक रुपयाही खर्च न करता ८ गोष्टी करा, कोरियन तरुणींसारखा चमकदार आणि सुंदर दिसेल चेहरा...

8 Tips To Get Korean Glass Skin At Home : कोरियन मुलींची त्वचा एकदम स्पाॅटलेस असते, तसा चेहरा हवा तर करा अगदी सोप्या गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 09:20 AM2023-05-19T09:20:04+5:302023-05-19T09:25:01+5:30

8 Tips To Get Korean Glass Skin At Home : कोरियन मुलींची त्वचा एकदम स्पाॅटलेस असते, तसा चेहरा हवा तर करा अगदी सोप्या गोष्टी

How to get perfect Korean glass skin with natural ingredient | एक रुपयाही खर्च न करता ८ गोष्टी करा, कोरियन तरुणींसारखा चमकदार आणि सुंदर दिसेल चेहरा...

एक रुपयाही खर्च न करता ८ गोष्टी करा, कोरियन तरुणींसारखा चमकदार आणि सुंदर दिसेल चेहरा...

आपण सर्वच आपल्या त्वचेची काळजी योग्य पद्धतीने घेत असतो. आजच्या काळात प्रत्येक स्त्रीला आपली त्वचा नितळ, सुंदर, तजेलदार अशी हवी असते.  अशी त्वचा मिळवण्यासाठी स्त्रिया विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने आणि महागडे उपचार करण्यावर जास्त भर देतात.  पण, ही उत्पादने केवळ रसायनांनी भरलेली नसून, ते आपल्याला अपेक्षित परिणामही देत ​​नाहीत. चमकणारी त्वचा प्रत्येकाला हवी असते. पण बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. या काळात निरोगी त्वचाही कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे असते. 

कोरियन तरुणींची त्वचा अतिशय नितळ आणि सुंदर असते. अशीच सुंदर आणि डागविरहीत त्वचा प्रत्येक तरुणीला हवी असते. कोरियन तरुणी महागड्या ब्युटी प्रोडक्टऐवजी त्वचेसाठी घरगुती उपचार करण्यावर भर देतात. कोरियन तरुणी केवळ मेक अपमुळे सुंदर दिसतात, असा बहुतांश जणांचा समज असतो. पण त्यांचे सौंदर्य मेकअपमुळे नव्हे तर घरगुती उपचारांमुळे खुलते. या तरुणी आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहावी, यासाठी नियमित स्किन केअर रुटीन फॉलो करतात. चेहऱ्याच्या देखभालीसाठी या तरुणी नैसर्गिक उपचारांची मदत घेतात. तुम्ही देखील आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये या गोष्टींचा सहजरित्या समावेश करू शकता(How to get perfect Korean glass skin with natural ingredient).

कोरियन तरुणी स्किन केअर रुटीनमध्ये नेमकं काय करतात ?  

१. रात्री चेहरा स्वच्छ धुवून झोपावे :- आपल्यापैकी बहुतेक स्त्रिया सकाळी फक्त अंघोळ करतानाच आपला चेहरा धुतात. परंतु, आपल्यापैकी बऱ्याच महिला रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ करून झोपत नाही. निरोगी त्वचा मिळविण्यासाठी, रात्री चेहरा धुणे आवश्यक असते. दिवसातून किमान दोनदा चेहरा स्वच्छ करणे आवश्यक असते. कोरियन महिलांच्या त्वचेसारखी नितळ त्वचा मिळवण्यासाठी रात्री झोपण्याआधी चेहेरा स्वच्छ करणे गरजेचे असते. 

रात्री मेकअप काढायला विसरलात? ५ सोप्या टिप्स - एवढे नाही केले तर चेहरा खराब झालाच समजा...

२. वाफ घेणे :- नियमितपणे १० ते १५ मिनिटे चेहेऱ्यावर वाफ घेणे त्वचेसाठी चांगले असते. यामुळे त्वचेचे उघडलेले छिद्र बंद करते आणि त्वचा मऊ करते. वाफ  घेतल्याने त्वचेच्या पृष्ठभागावरील जीवाणू काढून टाकण्यास मदत करते. तसेच त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्सना आपल्या त्वचेत खोलवर मुरण्यास वाफ घेणे उपयुक्त ठरते. 

३. चेहेऱ्यावरील मुरुम फोडून नये :- अनेक महिलांना झोपताना हातांनी पिंपल्स फोडण्याची सवय असते. मुरुम हे सहसा त्वचेवर असणाऱ्या घाणेरड्या   बॅक्टेरियामुळे होतात. जेव्हा आपण मुरुम हातांनी फोडतो तेव्हा त्वचेभोवती बॅक्टेरिया पसरतात, ज्यामुळे चेहेऱ्यावर अधिक मुरुम येण्याची शक्यता असते. यामुळे चेहेऱ्यावर आलेली मुरूम हातांनी किंवा नखांनी फोडण्याचा प्रयत्न करु नये. 

डोळे कायम सुजलेले दिसतात, झोपेतून उठल्यासारखे? थंडगार चमच्याचा १ सोपा उपाय, सूज होईल कमी...

४. त्वचेला एक्सफोलिएट करावे :- त्वचेला एक्सफोलिएट केल्याने फेशियलसारखे फायदे मिळतात. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचा चमकदार आणि गुळगुळीत होते. परंतु, आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळाच त्वचेला एक्सफोलिएट करावे, त्वचेला जास्त वेळा एक्सफोलिएट करू नये.

५. बर्फाने चेहेऱ्याला शेक द्यावा :- त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपण बर्फाचा वापर करू शकतो . यामुळे त्वचेवरील सूज आणि लालसरपणा कमी होण्यास मदत मिळते, बर्फाने चेहेऱ्याला शेक दिल्यावर त्वचा टाइटनिंग आणि पिंपल्सची समस्या कमी होते.

१ चमचा शुद्ध तूप घ्या आणि बनवा घरीच १०० % नैसर्गिक मॉइश्चरायझर, त्वचा होईल नितळ-चमकदार...

६. भरपूर पाणी पिऊन त्वचेला हायड्रेट करावे :- रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे. शरीरातील पाण्याची पातळी निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेशन आवश्यक आहे. पाणी आवश्यक पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. हायड्रेटेड राहिल्याने आपल्याला कायम फ्रेश वाटते आणि त्वचा चमकदार दिसते.

७. त्वचेला मॉइश्चरायझिंग करावे :- त्वचेच्या संरक्षणासाठी मॉइश्चरायझिंग करणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेचा  कोरडेपणा दूर होतो. त्वचेला मॉइश्चरायझिंग केल्याने त्वचा मऊ, निरोगी आणि नितळ होते. 

तांदूळ व मसूर डाळीचा डी - टॅन फेसमास्क, उन्हानं झालेलं टॅनिंग चुटकीसरशी गायब, त्वचा दिसेल चमकदार...

८. पुरेशी झोप घेणे गरजेचे असते :- दररोज रात्री ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने आपले आरोग्य तर चांगले राहतेच पण केस आणि त्वचेवरही त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.

Web Title: How to get perfect Korean glass skin with natural ingredient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.