रोजच्या कामाच्या गडबडीत स्किन टॅनिंगकडे नेहमी दुर्लक्ष होत असतात. ओठ काळपट दिसतात आणि अनेक दिवस दुर्लक्ष केल्यामुळे ओठांवरचे टॅनिंग तसंच राहतं. चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यात ओठांची महत्वाची भूमिका असते. (How to remove lips tanning) लिपस्टीक लावल्याने महिला थोड्यावेळासाठी ओठांचा काळेपणा लपवू शकतात पण नंतर पुन्हा ओळ काळे दिसू लागतात. लिपबाम लावूनही ओठांचा रंग बदलत नाही. ओठांचा रंग चांगला राहण्यासाठी काही सोपे सोल्यूशन आहेत. ज्याच्या वापराने ओठांचा काळेपणा दूर होईल आणि कोणते साईड इफेक्ट्सही उद्भवणार नाहीत. (Pink lips solution home remedies secret to rosy)
साखरेचा स्क्रब
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी साखर हा उत्तम पर्याय आहे. सारखरेचा स्क्रब ओठांवरील डेड सेल्स काढून टाकतो. त्यामुळे ओठ साफ होतात. याचे मिश्रण बनवण्यासाठी एक चमचा साखरेत १ लिंबू मिसळा आणि ३ ते ४ मिनिटांसाठी स्क्रब करा. २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास ओठांवरील डेड स्किन साफ होईल आणि डार्क स्पॉर्ट्स कमी होण्यास मदत होईल.
५ मिनिटांत ब्लॅकहेड्स निघून जातील; लिंबू आणि दह्याचे उपाय, ब्लॅकहेड्स काढताना दुखणारही नाही
मलई आणि हळद
हळद त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच मलई ओठांना पोषण देते. झोपण्याआधी ओठांना हळद आणि मलईची पेस्ट लावून झोपा. हळदी एंटी बॅक्टेरिअल- एंटी इफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे ओठांचा काळेपणा दूर होतो. यामुळे ओठ फाटत नाही आणि मऊ राहतात.
केसांना तेल लावून झोपल्यावर चेहरा चिपचिपा होतो? केसांचे तेल चेहऱ्यावर उतरु नये म्हणून....
काकडी
काकडी ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करते. काकडीत व्हिटामी ए, व्हिटामीन सी मुबलक असते. हे तयार करण्यासाठी काकडीचा रस काढून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर एका कापसाच्या बोळ्याने आपल्या ओठांवर हे मिश्रण लावा. ओठांवर अर्ध्या तासासाठी तसंच लावून सोडून द्या नंतर साध्या पाण्यानं धुवून घ्या.
नारळाचं तेल
नारळाचं तेल ओठांना पोषण देते. याव्यतिरिक्त पिग्मेंटेशन होत नाही. नारळाच्या तेलात मोठ्या प्रमाणात फॅटी एसिड्स असतात जे ओठाचं मॉईश्चर टिकवून ठेवतात. नारळाचं तेल तुम्ही लिप बामप्रमाणे ओठांवर लावू शकता. नारळाच्या तेलाचा नियमित वापर केल्याने सुर्याच्या हानीकारक रेज पासून बचाव होतो.